सांगली (जिल्हा संपादक संजय तोडकर) । एमआयडीसी कुपवाड पोलिसांनी (सांगली) बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या वाहनातून ५ गोवंश जनावरांची सुटका केली आहे. क्रूरतेने बांधलेल्या अवस्थेत या गायी आढळल्या असून, पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून तपास सुरू केला आहे. ही कारवाई गोवंश तस्करी रोखण्यासाठी पोलिसांच्या धडाकेबाज मोहिमेचा भाग आहे.
वाहनांमध्ये एकूण पाच गोवंश गायी असे जनावरे यांना पुरेशी हवा चारा पाणी, कोणतीही उपाययोजना न करता सदर जनावरांना अनावश्यकरीत्या दोरीच्या साह्याने जखडून दाटीवाटीने वाहनांमध्ये कोंबून कत्तल करण्याच्या उद्देशाने वाहतूक करीत असताना एमआयडीसी कुपवाड पोलिसांनी यल्लाप्पा हजारप्पा जलवा दे (वय ४८ वर्ष, राहणार कवलंगी गाव तालुका विजापूर जिल्हा विजापूर राज्य कर्नाटक), विठ्ठल बुद्धाप्पा कांबळे (वय ३५ वर्ष, राहणार -सुस्ताद,तालुका जत जिल्हा सांगली), भोपाल महादेव भराटे (वय २० वर्ष, राहणार- मिचनाल तालुका विजापूर जिल्हा विजापूर राज्य कर्नाटक), विजयकुमार आडिप्पा जलवा दे (वय ३५ वर्ष, राहणार -मीचनाल तालुका विजापूर राज्य कर्नाटक), सुनील अडिप्पा जलवादे (वय २९ वर्ष, राहणार -मीचनाल तालुका विजापूर जिल्हा विजापूर) या पाच जणांना ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणी मधुकर सुऱ्याबा सरगर यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणे गुरनं 47/ प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम 1960 चे कलम 11(1)(a), 11(1)(d), 11(1)(h), 11(1),(i) महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम 1976 चे कलम 5(a), 5(b), 9(b) BNS कलम 3(5)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोना कांबळे पुढील तपास करत आहेत.







