रावेर (जिल्हा प्रतिनिधी हमीद तडवी) – डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय तर्फे व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद महाराष्ट्रतर्फे आद्यक्रांती कारक बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्ताने कार्यक्रम घेण्यात आला, या प्रसंगी गावातील पोलीस पाटील युवराज पाटील यांच्या हस्ते आद्य क्रांतीकारक बिरसा मुंडा, छत्रपती शिवाजी महाराज, व डॉ.बाबासाहेब आंबेडकर या तिन्ही महापुरुषांना विनम्र अभिवादन करण्यात आले
बिरसा मुंडा यांचा जन्म झारखंडमधील उलिहातू या गावी १५ नोव्हेंबर १८७५ रोजी झाला. अशिक्षित आदिवासींवर इंग्रजांकडून होणारा अत्याचार पाहून इंग्रज अधिकाऱ्यांना धडा शिकवण्याचा विचार त्यांनी केला.त्यामुळे तरुण वयात त्यांनी समवयस्क आणि समविचारी संघटन निर्माण केले सहकार्याच्या बळावर इंग्रज सरकारच्या अन्यायाविरोधात 1895 साली लढा उभारला. इंग्रजांनी त्यांना अटक केली व तुरुंगात अतोनात छळ केला. ९ जून १९०० रोजी बिरसा मुंडा यांचा रांची कारागृहात मृत्यू झाला.
याप्रसंगी गावचे पोलीस पाटील युवराज पाटील, मुकुंदा अडकमोल, मेहमूद नहाळ, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद जळगाव जिल्ह्यातील कार्यध्यक्ष शरीफ तडवी, सहसरचिटणीस अय्याज तडवी,यशवंत पाटील, मुकुंदा पाटील,युनूस तडवी, राहुल काळे, सुनील सोनवणे, विकास अडकमोल, गौरव सोनवणे, विशाल सोनवणे, विनोद अडकमोल,गोविंदा सोनवणे, हर्षल अडकमोल, अजय वानखेडे, दीपक अडकमोल, उपस्थित होते तर वाचनालय चे अध्यक्ष :- देवेंद्र अडकमोल,आणि मार्गदर्शन केले व आभार अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद चे जळगाव सरचिटणीस अय्याज तडवी यांनी मानले







