चोपडा (रविन्द्र पाटील) – तालुक्यात कोविड १९ विष्णाणुचा वाढत्या संक्रमणा बाबत व चोपडा मतदारसंघातील इतर समस्यांवर विचारविनिमय करण्यासाठी आमदार लताताई सोनवणे व माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी आज जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत यांची भेट घेतली.
या भेटीत चोपडा उपजिल्हा रूग्णालयात १५ बेडचे आय.सी.यु.वार्ड बनवणे व या आय.सी.यु वार्डाचे इलेट्रीफिकेशन करणे आवश्यक आहे., चोपडा उपजिल्हा रूग्णालयात १२ वर्ष जुनी रूग्ण वाहिका वारंवार खराब होत असल्याने रूग्णाची गैरसोय होते त्यासाठी चोपडा उपजिल्हा रूग्णालयसाठी १ नविन अद्दयावत रूग्णवाहिका मिळावी., कोविड संक्रमित रूग्णांची संख्या वाढत असल्याने अजुन सर्व सुविधा युक्त नविन ५० बेड चोपडा उपजिल्हा रूग्णालयात उपलब्ध करण्यात यावे., चोपडा व यावल तालुक्यातील आदिवासी भागात वाडी वसतींना महसुली दर्जा नसल्याने या विकासापासुन वंचित राहत असल्याने या वाडी वस्तीना महसुली दर्जा प्राप्त होण्या बाबत बैठक लावण्यात घ्यावी., चोपडा तहसील प्रशासनावर अतिरिक्त कामाचा ताण वाढत असल्याने नायब तहसीदार पदाची तीन व अवल कारकुन दोन ही रिक्त पदे तात्काळ भरावित. वरील सर्व समस्या सोडविण्यासाठी तात्काळ उपायोजन करण्याचे आश्वासन मा.जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत यांनी आमदार लताताई सोनवणे व माजी.आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे यांना दिले.







