धरणगांव कोविड सेंटर मधून १७ रुग्णांना डिस्चार्ज!

धरणगाव (योगेश पी पाटील) – तालुक्यातील धरणगांव कोविड सेंटर मधून १७ रुग्णांना दि.६जुलै रोजी डिस्चार्ज देण्यात आला. जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री मा.ना.गुलाबरावजी पाटील सो यांनी बरे झालेल्या रुग्णांना गुलाबाचे फुल,सॅनिटायझर बोटल,आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथी गोळ्या देऊन व सर्वांना पेढा भरवून त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत करून त्यांना घरात राहून आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या व केंद्र राज्यशासनाने दिलेल्या आदेश तंतोतंत पाळणं करून घरी सुखी राहायच्या शुभेच्छा दिल्यात.
बरे झालेले रुग्ण यास्मिन देशमुख, मुमताज देशमुख, शेख जुबेर,शेख रफिक,जिजाबाई तुकाराम पाटील,भटाबाई पाटील,संदीप माळी, मनोज पाटील,शेख आबीद,जारीना बी-शेख,कु धनश्री पाटील सर्व पाळधी, नंदलाल रामसिंग झुरखेड,गायत्री मराठे धरणगांव,सखूबाई चौधरी, कल्पना पाटील,प्रकाश पाटील,भास्कर चौधरी सर्व धरणगांव.
या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ,उपजिल्हा प्रमुख पी.एम.पाटील सर,नगराध्यक्ष निलेश चौधरी, प्रात सो विनय गोसावी, तहसीलदार नितीन देवरे,नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ,मुख्याधिकारी जनार्दन पवार ,शहर प्रमुख राजेंद्र महाजन ,उप तालुका प्रमुख मोती अप्पा पाटील,उपनगराध्यक्ष विलास महाजन, गटनेते पप्पू भावे,नगरसेवक वासुदेव चौधरी,पालक मंत्र्यांनचे पीए नारखेडे सो, संजय चौधरी, वाल्मिक पाटील,किरण अग्निहोत्री, अरविंद चौधरी, गोलू चौधरी, तालुका वैद्यकीय अधिकारी टी.एस. सोनवणे, धरणगांव न.पा आरोग्य विभागाचे गांगुर्डे सो, सहाय्यक निलेश वाणी सर्व सफाई कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते. कोविड सेंटर चांगल्या सुविधा पुरवल्या जात असल्याचा प्रतिक्रिया सायली मेडिकलचे कर्मचारी भास्कर चौधरी यांनी दिल्यात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here