नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – खांदेश्वर पोलीस स्थानक हे मध्यवर्ती ठिकाणी असावे या विषयाला अनुसरून क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशन च्या अध्यक्षा सौ.रुपालीताई शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांसहित संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
यात त्यांनी नमूद केले आहे की, खांदेश्वर पोलीस स्थानक हे अगदीच मध्यवर्ती ठिकाणी नसून ते कार्यक्षेत्राच्या एका बाजूचे सीमेलगत असल्याने त्या विरूद्ध सीमेलगतच्या नागरिकांना तक्रार देण्यासाठी खूप वेळ लागतो व पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांना सदर ठिकाणी पोलीस मदत पोहचवन्यास देखील विलंब होतो, व विरुद्ध सीमेकडून येण्यासाठी काही वेळा वाहन ही उपलब्ध होत नाही , त्यामुळे पिडीतांना याचा त्रास होत आहे.
खांदेश्वर पोलीस ठाणे खांदा कॉलनी गुरुद्वारे च्या बाजूलगत भूखंड राखीव ठेवला आहे तरी आपण ही बाब लक्षात घेऊन खांदेश्वर पोलीस स्थानक हे मध्यवर्ती त्या राखीव भूखंडावर ठिकाणी हलवण्यात यावे, जेणेकरून पिडीत व्यक्ती किंवा स्थानकातील पोलीस अधिकारी वेळेवर घटना स्थळी दाखल होऊन कार्यवाही करतील. व पिडीत व्यक्तीला न्याय मिळवून देण्यात मदत करतील, हीच क्रांतिज्योत फॉउंडेशन च्या वतीने आपणांस नम्र विनंती. अशा स्वरूपाचे निवेदन सादर करून त्यांनी जनहितार्थ कार्य केले आहे.








