नाशिक (विशेष प्रतिनिधी इंजि. कुबेर जाधव) – कौन बनेगा करोडपती हो खरंच आहे …. असाच एक प्रश्न कांदा या विषयावर महानायक अमिताभ बच्चन यांनी कौन बनेगा करोडपती मध्ये विचारला. अगला सवाल ये है आपके लिए इस सवाल का जवाब दिया तो आप करोडपती बन सकते है तो सवाल ये है कि लासलगाव का प्याज किस राज्य से आता है… रात्रंदिवस काबाडकष्ट करणारा खरा शेतकरी केव्हा करोडपती बनणार हा प्रश्न व्यंगचित्र कार किरण मोरे यांनी आपल्या व्यंगचित्रातुन महानायक अभिताभ बच्चन यांना उलट सवाल केला आहे.
कांदा पोहचला कौन बनेगा करोडपतीमध्ये
या सर्व कांदा पुराणात अजून कडी झाली ती, कांदा या विषयावर थेट कौन बनेगा करोडपती या लोकप्रिय मालिकेत अमिताभ बच्चन यांनी हॉटसीटवर बसलेल्या व्यक्तीला प्रश्न विचारा की, “लासलगाव का प्याज किस राज्य मे है।’ प्रश्न एकदम सोपा व सरळ होता पण त्याऐवजी जर अभिताभ बच्चन यांनी ‘प्याज कि पैदावार करनेवाला किसान कैसे करोडोपती बनेगा’ असा सवाल केला असता तर तमाम कष्टकरी शेतकऱ्यांना धन्य वाटले असते. हा लक्षवेधी प्रश्न उपस्थित करण्याची सुबुद्धी सुचावी म्हणून, नाशिक जिल्ह्यातील कांदा डाळिंब उत्पादक प्रसिद्ध व्यंगचित्रकार बागलाणकर किरण मोरे यांनी कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात कांद्यावर विचालेल्या प्रश्नांवर आपल्या व्यंगचित्रातून टीका करीत कष्टकरी शेतकऱ्यांची व्यथाच मांडली आहे.
– कुबेर जाधव
संपर्क प्रमुख, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना
सध्या कांदा हा विषय महाराष्ट्रासह संपूर्ण देशात चर्चेत असून, निसर्गाच्या लहरीपणाने देशाअंतर्गत मागणी आणि पुरवठयाचे गणित बिघडल्यामुळे कांद्याचे भाव तेजीत आहेत. त्यामुळे कांद्याने सर्व राजकारणी, मिडीयासह सर्वच घटकांचे लक्ष वेधून घेतले आहे. बिहारमधील विधानसभाही त्याला अपवाद ठरली नाही. नितीशकुमारांच्या सभेत कांदे फेकून राजकारणी व शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रकार घडला आहे.







