खुलताबाद तालुक्यातील पोलीसांनी पकडलेल्या मोटरसायकल चोरांनी दिली कबूली

khultabad-police

https://www.facebook.com/BulandPoliceTimes/videos/414715466206613/?t=2

 

 

खुलताबाद बाजार सावंगी (प्रतिनिधी मूनीर शाह) – तालुक्यातील बाजार सांवगी व परिसरात मागील महिन्याभरात मोटरसायकल चोरटय़ांचा धुमाकूळ घालत बाजार सावंगी व परिसरातून नुसत्याच मोटरसायकली चोरीला जात होत्या
पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पोलिसांसमोर या प्रकाराचे आव्हानच होते.

 

या चोरटय़ांविरुद्ध खुलताबाद पोलीसांनी जातीने लक्ष देऊन सापळा रचून दोन चोरांना अटक करण्यात खुलताबाद पोलिसांना यश आले आहे. या दोन्ही चोरट्यांनी खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी, टा राजेरायसह परिसरातील मोटारसायकल चोरी केल्याचे कबूल केले आहे. तसेच या चोरट्यांकडून परिसरातून चोरलेल्या तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. दोन्ही आरोपी खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी, काणडगाव येथील आहेत

 

ही कामगिरी औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षका मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खुलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सीताराम मेहेत्रे. पोलिस हेड कॉन्स्टेबल नवनाथ कोल्हे, पोलिस जमादार बीघोत, योगेश नाडे, यतीन कुलकर्णी, संतोष, प्रकाश ठोकल यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here