प्रभाग ८५ मध्ये दिपावलीनिमित्त भावी नगरसेविका सौ. शालिनीताई अंकुश म्हात्रे परिवाराने दिल्या घरोघरी जावून शुभेच्छा

shalinitai-mhatre

नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – दिपावली निमित्त नेरूळ प्रभाग ८५ मध्ये भावी नगरसेविका सौ. शालिनीताई अंकुश म्हात्रे यांनी प्रभागामध्ये घरोघरी जावून शुभेच्छा देण्यास सुरूवात केली आहे. नेरूळमधील अन्य राजकारणी उटणे बनविण्यात व्यस्त नेरूळ नोडमध्ये म्हात्रे परिवाराने दिवाळीच्या शुभेच्छा घरटी दिल्यामुळे त्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत आहे.

 

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घरोघरी जावून शुभेच्छा देताना भावी नगरसेविका सौ. शालिनीताई अंकुश म्हात्रे यांनी साखर, रवा,मौदा, आणि डाळ दिपावली भेट दिली आहे. घरोघरी जावून दिपावलीच्या शुभेच्छा देताना रहीवाशांची आस्थेवाईक चौकशी करत म्हात्रे परिवाराने एकप्रकारे सुसंवाद अभियान सुरू केले असल्याचीही चर्चा सुरू झाली आहे.navi-mumbai-diwali

 

दिपावलीच्या शुभेच्छा देण्यासाठी रहीवाशांना भेटी देताना नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष योगेश रघुनाथ गोरे, अंकुश दादा म्हात्रे, अंबादास कळसे, श्रीकांत माने आदी त्यांच्यासमवेत उपस्थित होते.navi-mumbai

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here