शहादा (तालुका प्रतिनिधी विजय निकम) – आज दि. 19 नोव्हेंबर स्वर्गवासी इंदिरा गांधी जयंती निमित्त शहादा येथे काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी मित्र पक्ष यांच्याकडून इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे काँग्रेस व मित्र पक्ष यांच्याकडून स्व. इंदिरा गांधी जयंती साजरी करण्यात आली भारतातील पहिल्या पंतप्रधान महिला म्हणून त्यांनी पदभार सांभाळला वयाच्या अकराव्या वर्षी त्यांनी स्वतंत्र सैनिकाच्या मदतीने अलाहाबादातील मुलांची 1930साली वानर सेना नावाची संघटना स्थापन केली तसेच 1959 वर्षी मध्ये त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष म्हणून पदभार सांभाळला आणि 1966 वर्षी पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळले होते आज जे काही भारतात विविध उपक्रम योजना बरेच योजना दिले जातात इंदिरा गांधी यांचेही देन आहे प्रगतिशील भारत घडवण्यासाठी त्यांचा मोठा हातभार आहे म्हणून आज संपूर्ण भारतभर त्यांच्या विविध ठिकाणी कार्यक्रम घेण्यात येत आहेत.
या कार्यक्रमाला सुभाष अण्णा पाटील जिल्हा कार्यध्यक्ष नंदुरबार, अशोक पाटील किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष नंदुरबार सुरेश नाईक शहादा तालुकाध्यक्ष, अशोक मुकरंदे शहादा शहर अध्यक्ष, वाजीद सैयद, हाजी मकसद, गणेश पाटील,चंद्रकांत पाटील, सुरेन्द्र कुवर,भगवान अलकरी उत्तम पाटील,राजेश जेठे,साहिल हासमानी,इकबाल शेख,पवनभाऊ, राजु मालचे आदी मान्यवर उपस्थित होते.








