नंदूरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – शहरातील पोद्दार इंटरनॅशनल स्कुल आणि म्युन्सिपल हायस्कूल येथे स्वॅब संकलन शिबिरात 3 पथकाद्वारे 432 व्यक्तिंची कोरोना चाचणी करण्यात आली.
पहिल्या पथकाद्वारे पोद्दार इंटरनॅशनल स्कूल येथे 83 इतर दोन पथकाद्वारे म्युन्सिपल हायस्कूल येथे, 161 आणि 155 स्वॅब संकलन करण्यात आले. काही खाजगी रुग्णालयात दाखल व्यक्तिंचीदेखील कोरोना चाचणी करण्यात आली. जिल्हा शासकीय रुग्णालय वैद्यकीय अधिकारी पथक डॉ. मनीष नाद्रे, डॉ.दिपाली पाडवी, डॉ.अश्विनी देसले, डॉ. प्रशांत सुर्यवंशी, डॉ.जागृती परमार, परिचारीका आदिंनी स्वॅब संकलन केले.
नंदुरबार तालुक्यात अद्यापही कोरोनाचे संकट संपले नसल्याने नागरीकांना आजाराची लक्षणे दिसत असल्यास स्वॅब तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन तहसिलदार भाऊसाहेब थोरात यांनी केले आहे.







