डॉ.श्रीकांत रामचंद्र धुमाळ यांना डीपीआयडी कोविड १९ योध्दा २o२० दादासाहेब फाळके आयकॉन ॲवार्ड फिल्म पुरस्कार

shrikant-ramchandra-dhumal

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – डॉ.श्रीकांत रामचंद्र धुमाळ यांना डीपीआयडी कोविड १९ योध्दा २o२० दादासाहेब फाळके आयकॉन ॲवार्ड फिल्म पुरस्कार दि. २३- नोव्हेंबर २०२० रोजी देवून, सन्मानित करण्यात येणार आहे.

 

श्रीकांत रामचंद्र धुमाळ हे पुण्यामध्ये राहत असुन लॉकडाऊन कालावधीत गरजु नागरिकांना अत्यावश्यक अन्नधान्य किट १४०० गरजु नागरीकांना व आदिवासी पारधी समाजातील १७० गरजु परिवारांना दिले, हे काम पाहुन त्यांना DPIAF कोरोना योध्दा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. काही ट्रस्टनी ऑनलाइन तर काही द्रस्टनी त्यांना प्रत्यक्ष बोलवून पुरस्कार दिला.

 

डॉ.श्रीकांत धुमाळ हे निस्वार्थी भावनेने समाजसेवा गेल्या २१ वर्षापासुन करत आहे, तसेच समाजसेवा केल्याबद्दल त्यांना मानद डॉक्टर ही पदवी बहाल करण्यात आली. डॉ. श्रीकांत धुमाळ करत असलेले कार्य कौतुकास्पद आहे व त्यांचे हे कार्य तरूण पिढीला प्रेरणादायी आहे,डॉ. श्रीकांत धुमाळ यांच्या कार्यास शुभेच्छा व भविष्यात त्यांनी अशाच प्रकारची गरजवंतांची सेवा करावी, ह्याच बुलंद पोलीस टाइम्सतर्फे त्यांना शुभेच्छा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here