जळगाव ग्रामीण तालुका काँग्रेस कमिटीतर्फे इंदिरा गांधी यांची जयंती साजरी

indira-gandhi-jayanti

जळगांव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – आज जळगांव ग्रामीण तालुका काँग्रेसतर्फे स्व.इंदिरा जी गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

 

भारताला सशक्त, समर्थ नेतृत्व आणि अद्‌भूत नियोजनाचे सामर्थ्य असणाऱ्या तत्कालीन इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वात भारताने एक सशक्त देश म्हणून जगात स्थान मिळविले होते. जगातील राजकारणात भारताचे म्हणणे ऐकले जाऊ लागले, त्यामागे दीर्घकाळ विचार करून इंदिरा गांधी यांनी आखलेले परराष्ट्र धोरणच कारणीभूत होते, असे यावेळी बोलताना मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

 

या कार्यक्रमाला प्रदेश सचिव डि.जी.पाटील साहेब – तालुका अध्यक्ष – मनोज डिंगबर चौधरी ,प्रमोद घुगे , धनराज जाधव, भाऊसाहेब सोनवणे सर, रविंद्र सोनवणे, संजय पाटील, सोमनाथ माळी, भिकन सोनवणे आदी.पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here