पोप फ्रान्सिस यांना मॉडेलचा बिकिनीमधील फोटो लाईक करणे पडले महागात

pope-francis

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – सध्या सोशल मीडियावर ख्रिश्चन समुदायाचे सर्वोच्च धर्मगुरु, पोप फ्रान्सिस यांची चांगलीच पोस्ट चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी पोप यांनी ब्राझीलच्या एका मॉडेलचा चक्क बिकिनीमधील फोटो लाइक केला मात्र त्यांचा या एका लाईकमुळे सोशल मीडियावर त्या लाईकचा स्क्रीनशॉट प्रचंड व्हायरल होत आहे.

 

मॉडेल नतालिया गरिबोटो ही स्कूल गर्लच्या वेशातील अत्यंत तोकड्या कपड्यांमध्ये दिसत आहे. याच फोटोला पोप यांनी लाइक केले. आता याचा स्क्रीनशॉट व्हायरल होत सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
यावर नेटकऱ्यांसह स्वतः नतालिया गरिबोटो हिनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. पोप यांनी लाइक केलेल्या स्क्रीनशॉटवर “किमान आता मी स्वर्गात जाईन”, अशी मजेशीर प्रतिक्रिया नतालिया गरिबोटो हिने दिली आहे.

 

दरम्यान नेटकऱ्यांकडून मोठ्या संख्येने कमेंट येत असून त्यामुळे ट्रोल झाल्यानंतर पोप यांच्या अकाउंटवरुन हा फोटो ‘अनलाइक’ करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here