राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांना गुरुवारी सायंकाळी तातडीने उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात येणार आहे. त्यांची प्रकृती चांगली असून, कोणत्याही प्रकारचा धोका नको म्हणून त्यांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्याचा निर्णय घेतला आहे.

 

एकनाथराव खडसे यांना कोरोनाची लागण झाल्याचा वैद्यकीय अहवाल गुरुवारी सायंकाळी प्राप्त झाला. मात्र, नाथाभाऊंची प्रकृती चांगली असून, कोणत्याही प्रकारचा धोका नको म्हणून त्यांनी मुंबईत उपचार घेण्याचा निर्णय घेतला आहे. नाथाभाऊ गुरुवारी दुपारी जळगावात त्यांच्या मुक्ताई या निवासस्थानी असताना त्यांना वैद्यकीय चाचणीचा अहवाल प्राप्त झाला.

 

याच आठवड्यात आधी नाथाभाऊंच्या कन्या जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अ‌ॅड. रोहिणी खडसेंना यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांनी स्वतः आपल्याला कोरोनाची लागण झाली आहे, असे त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर तसेच ट्विटर हँडलवर पोस्ट करत जाहीर केले होते. कोरोनाची लागण झाल्यामुळे आपल्या सर्वांपासून काही काळ दूर रहावे लागणार असल्याने वाईट वाटत आहे. परंतु, मी कोरोनाला लवकर हरवून आपल्या सर्वांमध्ये परत येईल, असा विश्वास अ‌ॅड. रोहिणीताई खडसेंनी व्यक्त केला होता.

 

एकनाथराव खडसे यांनी आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे जाहीर केले आहे. गेल्या आठवडाभरात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली वैद्यकीय चाचणी करून घ्यावी, कोरोनाची लागण होऊ नये म्हणून इतरांनी काळजी घ्यावी, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. दरम्यान, मी लवकर कोरोनावर मात करून परत येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here