ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचा कोरोना अहवाल निगेटीव्ह

eknath-khadse

मुंबई  – राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना कोरोनाची लागण झाल्याचं काल सांगितले गेलं होतं. पण आता त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे नाथाभाऊ मुंबईमध्ये उपचारासाठी बॉम्बे रुग्णालयात दाखल झाले असता त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, नाथाभाऊंचे मुंबईत आल्यानंतर दोन्हीही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी जाऊ देण्यात आले आहे. आज सकाळी 10 वाजता त्यांना रुटीन चेकअपसाठी बोलावण्यात आलं असल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे. दरम्यान, ‘मला कोरोनाची लागण झाली असून माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि कोरोनाची चाचणी करावी. तसेच मी बरा होईपर्यंत भेटण्यास येऊ नये’, असं आवाहन नाथाभाऊंनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून केलं होतं.

 

राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर नाथाभाऊ एकदम सुपर अ‌ॅक्शन मोडमध्ये आले होते. त्यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली होती. या भेटींदरम्यानच त्यांना कोरोनाची लागण झाली असावी अशी चर्चा होती. तर नाथाभाऊंच्या कन्या रोहिणीताई खडसे यांना कोरोनाची लागण झाली होती. रोहिणीताईंनी ट्विट करुन ही माहिती दिली होती. त्यांचीही प्रकृती उत्तम असून खबरदारी म्हणून रुग्णालयात दाखल होत असल्याची माहिती खुद्द रोहिणीताई खडसे यांनी दिली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here