श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान व जनमत प्रतिष्ठानतर्फे मोफत ब्युटी सेमिनार

janmat-pratisthan

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान व जनमत प्रतिष्ठानकडून स्मार्ट लूक ब्युटी वर्ल्ड मध्ये मुली ,गृहिणी साठी मोफत ब्युटी सेमिनार आयोजित करण्यात आला.

 

त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे श्री देवेंद्रजी भावसार विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री यांनी आत्मनिर्भर भारत व महिलांना स्वयंरोजगार विषयी मार्गदर्शन केले, तसेच महिला निर्मूलन अत्याचार समितीच्या जिल्हाध्यक्ष सौ सूचित्राताई महाजन यांनी मुलींच्या सक्षम तेवर मार्गदर्शन केले. shivtej-prtishthan

 

 

मुलींनी स्वतःच्या पायावर उभी राहून कसा व्यवसाय करावा याविषयी त्या बोलल्या. या प्रसंगी श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान चे अध्यक्ष दिपक जी दाभाडे यांनी सूत्रसंचालन केले व जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज जी नाले, यांनी कार्यक्रमाचा समारोप केला, व सेमिनार साठी स्मार्ट ब्युटी वर्ल्ड च्या संस्थापिका अनिता दसरे मॅडम,,व अन्याय अत्याचार निर्मूलन समिती जिल्हा संघटक हर्षाली पाटील यांचे मार्गदर्शन लाभले

beauty-seminor-jalgaon۔

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here