बालदिन आणि दिवाळी पुलाखालील मुलांसोबत उत्साहात साजरी

disha-praisthan-mumbai

मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरुण चव्हाण) – गरिबीमुळे पुलाखाली दिवस काढणाऱ्या मुक्त लहान मुलांसोबत दिशा प्रतिष्ठानच्या अध्यक्ष सौ. दिशा कळंबे यांनी बालदिन आणि दिवाळी उत्साहात साजरी केली गेली.

 

 

गोरेगांव येथील ओबेरॉय मॉल जवळील पुलाखालील लहान मुला – मुलींना जेवण आणि दिवाळी फराळ तसेच चॉक्लेट – बिस्किट – फ्रूटी वाटप करून मुलांना आनंद त्यांनी दिला. त्याचबरोबर तिथे ही मुलं राहत वावरत असल्याने अनेक व्यसनी लोकांशी त्यांचा संपर्क येत असतो. काहींचे पालकही व्यसनाधीन झालेले असतात. या मुलांनी व्यसनांच्या आहारी जाऊ नये म्हणून त्यांना व्यसनांचे प्रकार, त्याचे शरीरावर होणारे दुष्परिणाम, व्यसन केल्यास होणारी शिक्षा आणि आजार या संदर्भात माहिती देऊन मार्गदर्शन करून व्यसनांनपासून दूर राहण्याचा संदेश दिला.

 

 

मुलांनाही व्यसनांपासून दूर राहण्याची प्रतिज्ञा घेतली. या उपक्रमात सौ. दिशाताई यांच्या सोबत त्याचे संस्था सदस्य नुपुर महाडिक, सरिता साटम उपस्थित होत्या.diwali-with-poor-child

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here