राष्ट्रवादीच्या वक्ता प्रशिक्षण अध्यक्षपदी योगेश पाटील

yogesh-patil-chalisgaon.

चाळीसगाव (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वक्ता प्रशिक्षणविभागाच्या जळगांव लोकसभा अध्यक्षपदी योगेश राजधर पाटील, चाळीसगांव यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियुक्ती बद्दल सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
मुंबई येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या वक्ता प्रशिक्षण विभागाच्या बैठकीत खासदार सौ.सुप्रिया सुळे यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी कॉंग्रेस वक्ता प्रशिक्षण विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रदिप सोळुंके यांनी चाळीसगांव येथील कार्यकर्ते योगेश राजधर पाटील यांची जळगांव लोकसभा अध्यक्षपदी नियुक्ती केली.

 

सदर नियुक्ती पत्र हे खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते देण्यात आले. या वेळी प्रदेशाध्यक्ष प्रदिप सोळुंखे, उपाध्यक्ष तुषार वाघमारे, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख मंगेश पाटील तसेच विविध सेलचे प्रमुख व नेते उपस्थित होते.

 

योगेश पाटील यांचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी पालकमंत्री सतीश पाटील, माजी आमदार तसेच जळगाव जिल्हा बँकेचे संचालक राजीव देशमुख, जिल्हा दुध संघाचे संचालक प्रमोद पाटील यांनी तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सर्व नेते व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here