शहादा (विजय पाटील) – महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री व महाराष्ट्राच्या हरितक्रांतीचे प्रणेते कै.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्ताने महाराष्ट्र शासनाकडून कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
या सप्ताहादरम्यान कृषी विभागाकडून वेगवेगळ्या योजना राबविण्यात आल्या यात रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग लागवड २ हेक्टरच्या आत जमी असावी, जॉब कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक, ७/१२ उतारा ८ अ उतारा, रोहयो अंतर्गत नॅडेप, व्हर्मी कंपोस्ट तयार करणे, शेतकऱ्यांची शेतीशाळा घेणे, २५ शेतकरी ८ वर्ग पीकाबाबत मार्गदर्शन करणे. क्रॉपसॅप अंतर्गत कापूस, ज्वारी, मका, तूर, सोयाबीन, ऊस, एका गावात दोन प्लॉट दर आठवड्याचे निरीक्षणे घेऊन पाठविले जाते. रोग कीड नुकसानाची पातळी समजते व जास्त झाले हे समजते.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत अपघाती मृत्यूकरिता २ लाख, अवयव निकामी झाल्यास २ लाख देण्यात येतात, याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली.
Home Uncategorized महाराष्ट्र शासनातर्फे कै.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन







