छेड काढली म्हणून सांताक्रूझमध्ये तरुणाचा खून

kolhapur murder

मुंबई (हितेश मिस्त्री) – तरुणीची छेड काढणाऱ्या तरुणाची हत्या केल्याचा प्रकार सांताक्रूझ परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी वाकोला पोलिसांनी पाच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अटक केली. मयूर जोशी (२९) असे मृत तरुणाचे नाव आहे.

 

गेल्या आठवडय़ात मयूरने त्याच परिसरात राहणाऱ्या एका तरुणीची छेड काढली होती. हा प्रकार तिने आपल्या एका मित्राला सांगितला. त्याने शुक्रवारी चार ते पाच साथीदारांसह मयूर याला गाठले. त्या सर्वानी भररस्त्यात मयूरला बेदम मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाला. रविवारी मयूरचा मृत्यू झाला.

 

पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून तपास केला. त्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या चित्रणावरून पोलिसांनी पाच विद्यार्थ्यांची ओळख पटवून त्यांना अटक केली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here