मुंबई (प्रतिनिधी चित्रपट विभाग गणेश तळेकर) – रविवार दि.२२ नोव्हेंबर २० रोजी लोकस्वराज्य फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन ट्रेड युनियनच्या पालघर जिल्ह्यातील कार्यकारिणीतील सर्व पदाधिकाऱ्यांना, को.म.सा.प. च्या साहित्य दालन, डहाणू पारनाका येथील सोहळ्यात पालघर जिल्हाध्यक्ष भरतजी जगताप यांच्या शुभहस्ते नियुक्तीपत्र वितरित करून पदनियुक्त करण्यात आले.
लोकस्वराज्य ही कलाकरांची कलाकारांसाठी असलेली राष्ट्रीय युनियन असून फिल्म व टेलिव्हिजन क्षेत्रातील कलाकारांना योग्य न्याय मिळवून देणे हे सदर संस्थेचे आद्यवैशिष्ट्य आहे. देशव्यापी संघटनेद्वारे खेडोपाड्यापासून विकसित शहरांपर्यंत कलाकारांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी देशातील प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात कार्यकारिणी कार्यान्वित झाल्या आहेत. लोकस्वराज्य संस्थेचे संस्थापक अभिजित खरे असून राष्ट्रीय अध्यक्ष, प्रशांत खानविलकर व महाराष्ट्र राज्याध्यक्ष समीर सय्यद ह्यांच्या नेतृत्त्वाखाली पालघर जिल्यातील कार्यकारिणी पदाधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
लोकस्वराज्य पालघर जिल्हा कमिटी पुढीलप्रमाणे नियुक्त करण्यात आली आहे. पालघर जिल्हाध्यक्ष- भरत जगताप, डहाणू, कार्याध्यक्ष- विकास तरे, वाणगाव, उपाध्यक्ष – अनिल धारुळकर,विरार, अॅड.नेहा धारुळकर, विरार, सुषमा कुलकर्णी, बोईसर, मुख्य सचिव- प्रेमनाथ राऊत,डहाणू, उपसचिव-उज्ज्वला डामसे, डहाणू, प्रतिभा क्षीरसागर कदम, सफाळे, संपर्क प्रमुख- नागनाथ बाबर, बोईसर, सहसंपर्कप्रमुख- जतीन कदम, सफाळे, रमेश पागधरे, मुरबे, शिवाजी शिंदे, बोईसर, तक्रार निवारण प्रमुख- गीतांजली सावे, तारापूर, सह तक्रार निवारण प्रमुख – आशा दहाट, डहाणू. पालघर जिल्ह्यातील कलाकरांना समस्या असतील तर त्यांनी खालील पदाधिका-यांशी संपर्क साधावा, असे आवाहन भरत जगताप, विकास तरे, प्रेमनाथ राऊत यांनी केले आहे.







