आदिवासी रूग्ण सेवा समिती जिल्हा बुलढाणा यांच्यावतीने वसाळी येथे आरोग्य शिबिर संपन्न

buldhana-arogya-shibir

बुलढाणा (विशेष प्रतिनिधी) – रविवार दि,22-11-2020 रोजी संग्रामपुर तालुक्यातील वसाळी या गावा मध्ये आदीवासी रूग्ण सेवा समीती व सईबाई मोटे उप जिल्हा सामान्य रुग्णालय शेगाव यांच्यातर्फे नेत्र रोग निदान व आरोग्य शिबिर धेण्यात आले होते.

 

या कार्यक्रमाचे अध्यक्ष. संजय कायंदे (वसाडी वनपाल,), कार्यक्रमाचे उटघाटक. श्री डी.बी.तळवी (उप विभागीय पोलीस अधीकारी मलकापुर), प्रमुख उपस्थीती हेमंतजी पिल्ले (आदीवासी रूग्ण सेवा समीती अध्यक्ष.), हुसेनजी पालकर (प्रदेश उपाध्यक्ष आदीवासी भील समाज विकास समीती,), अख्तरजी मोरे (पंचायत समीती सदस्य संग्रामपुर), लालमनजी मावस्कर (माजी पं,स,सदस्य,), बालकराम कोल्हटकर (तंटामुक्ती अध्यक्ष वसाळी), जे.एस.पालकर (पोलीस पाटील वसाळी), डॉ.प्रेमचंद पंडीत (नेत्र रोग तज्ञ), डॉ.कल्पना पंडीत (महीला रोग तज्ञ), डॉ.रविशंकर जाधव (हदय रोग व मधुमेह तज्ञ,), डॉ.प्राची जाधव (वैद्यकीय अधीकारी स,मो,सा, रुगणालय शेगाव,), डॉ.आशुतोष पंड़ीत (वैद्यकीय अधीकारी), कु.रेणुका उदार (शिबीर समन्वयक), यांनी रूग्ण सेवा दिली.

 

नवीन वसाळी,जुणी वसाळी, हडयामहल,सायखेड,शिवणी,टुनकी,आलेवाडी,चीचारी येथील एकुण 74 रुग्णांनी शिबीराचा लाभ घेतला तर नेत्र शस्त्रक्रियाकरीता 32 रुग्णाना निवडण्यात आले निवडलेल्या रूग्णांवर दि12/12/2020 पासुन नियमाप्रमाणे एका दिवसात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.

शिबिराच्या यशस्वीतेकरिता डॉ.शाहरुख सुरत्ने,सुमीत पालकर,नजीर पालकर,समीर सुरत्ने,सरिन सुरत्ने,राम कासदेकर,यशपाल सुरत्ने,सरीचन कोल्हटकर,हातीम तायडे,बुधा भाऊ,लक्ष्मण गीरे,विजय लोनकर,यांनी परिश्रम घेतले तर कोरोना कालावधी लक्षात घेता सोशल डिस्टसींग, तोंड़ाला मास्क सँनीटायझरचा उपयोग करून काटेकोर नियमाचे पालन करून शिबीर संपन्न झाले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here