रायगड जिल्ह्याबरोबरच अलिबाग तालुक्यात देखील कोरोनाचा हाहाकार…..

अलिबाग -सोगावकर – मागील 24 तासात अलिबाग तालुक्यात कोरोना संसर्गित 44 रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. आतापर्यंत आढळलेल्या रुग्णांमध्ये आजचा सर्वाधिक उच्चांक आहे. सर्वाधिक रुग्ण कुरुळ गावात आढळले असून, त्यात आरसीएफ कॉलनीतील सहा रुग्णांचा समावेश आहे. कुुरुळ, गोंधळपाडा, चोरगुंडी-पोयनाड, कुदे, सुडकोळी, रायवाडी-आक्षी, मोठे शहापूर,चेढरे,वरसोली,नवेदर नवगाव, कातळपाडा-सातीर्जे येथील रुग्णांचा समावेश आहे.
सोमवारी अलिबाग तालुक्यात 44 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. यात सर्वाधिक 11 रुग्ण हे एकट्या कुरुळ गावामध्ये आढळले आहेत. त्यापैकी आरसीएफ कॉलनीत राहणार्‍या एकाच कुटूंबातील सहाजणांचा समावेश आहे. यात एका 63 वर्षीय पुरुषासह 1 वर्षीय बालिका तसेच 28, 53, 27, 22 या वयोगटातील पाच स्त्रियांचा समावेश आहे. तर कुरुळमधील नवेनगर येथील तिघाजणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, यात दोन पुरुष तर एका महिलेचा समावेश आहे. गुजरातमधून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कातून कोरोनाचा संसर्ग झाल्याचा निष्कर्ष आहे. आदर्शनगर मधील एका 58 वर्षीय पुरुष व 22 वर्षीय स्त्रीचा समावेश आहे. तसेच चोरगुंडी-पोयनाड येथे सहा रुग्ण आढळले. यात चार स्त्रीया तर दोन पुरुषांचा समावेश आहे. मोठे शहापूर येथील लक्ष्मी नारायण मंदिराजवळ राहणार्‍या तीन व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला असून यात दोन स्त्री तर एका पुरुषाचा समावेश आहे. सहाणगोठी येथे 4 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून यात तीन पुरुष व एका स्त्रीचा समावेश आहे. रायवाडी-आक्षीमधील दोन पुरुषांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कुदे येथील सहा वर्षीय बालकासह एका महिलेला तसेच एक स्त्री अशा तीनजणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. वरसोलीमधील दोघाजणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून यात एक स्त्री तर एक पुरुषाचा समावेश आहे. सुडकोळी तसेच नवखार-सुडकोळी येथील दोघा पुरुषांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. विद्यानगर येथील भालचंद्र छाया सोसायटीमधील 20 वर्षीय तरुणासह चेंढरे येथील आणखी एका 58 वर्षीय पुरुषाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आंबेपुर-सुभाषनगर येथील 78 वर्षी पुरुषाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मांडवखार, जिल्हा रुग्णालय शासकीय वसाहत, कातळपाडा-सातीर्जे, नवेदर नवगाव येथील प्रत्येकी एका व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
दरम्यान अलिबाग तालुक्यात आज आढळलेल्या 44 कोरोना बाधित रुग्णांमुळे एकूण रुग्ण संख्या 223 वर पोहोचली आहे. यापैकी 7 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 98 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. सद्यस्थितीत 118 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती देण्यात आली. आज एका दिवसात तब्बल 44 कोरोना संसर्गित रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे.गेल्या काही दिवसांत तरुणांमध्ये कोरोना ची लागण होण्याचे प्रमाणात लक्षणीय वाढ होत आहे. यासाठी तरुणवर्ग यांनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे, आपल्या निष्काळजीपणामुळे आपण हा आजार घरच्या लोकांना देऊ शकतो, यासाठी काही प्रमाणात आपण स्वतः जबाबदार राहणार असल्याचे बोलले जात आहे, असे नागरिकांच्या प्रतिक्रिया विचारात घेता लक्षात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here