चोपडा ( रविन्द्र पाटील) – गेल्या तीन महिन्यापासून चोपडा तालुक्यातील कर्जदारांकडून मायक्रो फायनान्स कंपनी बळजबरीने हप्ते
गोळा करत असल्याबाबत बुलंद पोलीस टाईम्स्ने आवाज बुलंद केला होता. त्या बातमीचे आता तालुक्यात पडसाद उमटत असून, आता युवा सेने मार्फत चोपडा तहसिलदार यांना निवेदन युवा सेना शिवसेना स्टाईलने जाब विचारणार असल्याचे पत्र युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष दीपक चौधरी यांनी तहसीलदारांना दिले आहे.
मायक्रो फायनान्स कंपन्या गेल्या तीन महिन्यां पासून , हम करे सो ••••. या पध्दतीने सक्तीने कर्ज वसुली करीत आहेत. जगभर पसरलेल्या कोरोना महामारीत सुद्धा बळजबरीने मायक्रो फायनांन्स वाले हप्ते वसुली करीत आहेत . बचत गट माध्यमातून कर्ज घेणाऱ्या महिला या सर्व हातमजुरी , मोलमजूरी करणाऱ्या महिला वर्ग आहे. लाॅक डाऊन मुळे मजूर वर्गाला काम धंदा मिळत नसून, कर्ज फेडायचे वांदे सध्या सर्वांचे झालेले आहेत . या आस्मानी संकटात घर चालवणे सुद्धा कठीण होवून बसले आहे .
या परिस्थितीत सुद्धा मायक्रो फायनान्स आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या कर्जदारांना धमक्या देऊन पैसे वसुली करीत आहेत . गव्हर्मेंटने कंन्टेंमेंटझोन सिल केल्यास तेथे सुध्दा मायक्रो फायनान्स कर्मचारी कंन्टेमेंटझोन मध्ये जाऊन दमदाटी करून पैसा वसूल करतांना दिसून येत आहे . लोकांच्या हाताला काम धंदा नसतानासुद्धा यांनी फोन करून धमकावणे तसेच घरी जाऊन अरेरावी करणे ह्या ना् त्या स्वरूपात पैसे वसुलीचा सपाटा सुरू केली आहे . तरी शासनाने यांना कुठेतरी लगाम लावायला हवा . जेणेकरून मजूर वर्गाला त्रास होणार नाही. अन्यथा युवा सेनेला शिवसेना स्टाईलने मायक्रो फायंनान्स कंपन्यांना जाब विचारावा लागेल तहसीलदार साहेब यांना . निवेदन देतांना युवा सेनेचे पदाधिकारी जिल्हा उपाध्यक्ष दीपक चौधरी, डॉ.रोहन पाटील (युवा सेना शहरप्रमुख). देवेंद्र बारी (युवा शहरप्रमुखप्रमुख). नंदू गवळी. गोलू मराठे. विश्वजीत धनगर. वांटेड. गौरव पाटील. बाळा बारी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.







