मुंबई (हितेश मिस्त्री) – ड्रग्ज पेडलर्सकडून गोरेगाव येथे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांवर हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर समीर वानखेडे यांच्या पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरने इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट लिहिली आहे. ‘समीर वानखेडे हे ठीक आहेत’, असे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे.
क्रांती रेडेकरने लिहिलं आहे, ‘तुम्ही दाखवलेल्या प्रेमाबद्दल आभार. समीर वानखेडे यांची तब्येत ठीक आहे. आमच्या घरातील सर्वच कुटुंबीय त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. एनसीबीच्या संपूर्ण टीमला सलाम. आम्हाला तुमचा अभिमान वाटतो’. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात बॉलिवूडचं ड्रग्ज कनेक्शनच्या तपासात कारवाई करणारे समीर वानखेडे होते. समीर वानखेडे हे एनसीबीचे विभागीय संचालक आहेत. गोरेगाव येथे त्यांच्या टीमवर हल्ला झाल्यानंतर तिघांना अटक करण्यात आली आहे.







