जॅकलीन फर्नांडीसच्या टॉपलेस फोटोला नेटकऱ्यांची पसंती

jackline

मुंबई (चित्रपट विभाग प्रतिनिधी सचिन देसाई) – जॅकलिन फर्नांडिसने पुन्हा टॉपलेस फोटो शेअर केला आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जॅकलिनच्या या मोनोक्रोम फोटोवर चाहते फिदा झाले आहेत. सर्व तिच्या सौंदर्याचे आणि हॉटनेसचे कौतुक करीत आहेत. तिने तो फोटो सोशल मीडियावर शेअर करत ‘बहुत बहुत दूर’ असे लिहले आहे.

 

सध्या जॅकलिन धर्मशाळा येथे भूत-पोलिस चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तिच्यासोबत सैफ अली खान, यामी गौतम आणि अर्जुन कपूर मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाचे शुटींग नुकतेच सुरू झाले आहे. जॅकलिन एक महिना हिलस्टेशन्समध्ये राहणार आहे, त्यानंतर ती मुंबईत परत येईल आणि रणवीर सिंगसोबत रोहित शेट्टीच्या चित्रपट सर्कसचे शुटींग करणार आहे.

 

बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ने आपल्या कामा बरोबरच वेगवेगळ्या अदांनी चाहत्यांमध्ये जागा बनवली आहे. तिची फक्त चित्रपटांमुळे लोकांमध्ये ओळख नाही तर तिची स्टाईल व डान्समुळे ओळख आहे. सद्या सोशल मीडियात जॅकलिन फर्नांडिसचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

 

या व्हिडिओत जॅकलिन ‘गेंदा फुल’ या गाण्यावर बेली डान्स केला आहे. तिचा हा व्हिडिओ सेलिब्रिटी डान्स टीचर संजना मुथरेजाने आपल्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ९ हजारांपेक्षा जास्त लोकांनी लाईक केले आहे. या डान्समध्ये जॅकलिन फर्नांडिस आणि संजना मुथरेजाचा डान्स अप्रतिम आहे. त्या झेंडूच्या फुलांवर नाचत असताना तिची स्टेप अप्रतिम आहे. यापूर्वीही संजना मुथरेजाने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसबरोबर आपले व्हिडिओ आणि फोटो शेअर केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here