जळगाव (प्रतिनिधी निलेश पाटील) – कोरोना संशयित रुग्णांच्या तपासणीचा अहवाल आज (दि.२५) सायंकाळी मिळाल्यानंतर जिल्ह्यात आजही बरे होणाऱ्यांपेक्षा बाधितांची संख्या पुन्हा जास्त आढळून आली आहे. जिल्ह्यात आज ९६ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. ४१ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
आज आढळलेल्या ९६ कोरोनाबाधितांमध्ये जळगाव शहर –२३, जळगाव ग्रामीण- ०३, भुसावळ- ०२९, अमळनेर- ०१, चोपडा-०७, पाचोरा-०३, भडगाव-०२, यावल-०४, जामनेर-०९,रावेर-०३, पारोळा-०२, चाळीसगाव-०२, मुक्ताईनगर-०१, इतर जिल्ह्यातील-०७ असे एकुण ९६ रूग्ण असा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ५४ हजार ३३० कोरोनाबाधित आढळले असून, असून ५२ हजार ५२५ रूग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. दरम्यान आज एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १२९१ झाली आहे. सद्यस्थितीत ५१४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.







