भाजप शहराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांचा वाढदिवस; गोशाळेत गाईंना चारा व लापशी खाऊ घालून पदाधिकाऱ्यांनी दिल्या शुभेच्छा

दीपक सूर्यवंशी

जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर प्रमोद रुले) : सामान्य कार्यकर्ता ते पक्षाचे जिल्हा महानगर अध्यक्ष असा उल्लेखनीय प्रवास करणारे आणि आपल्या कुशल संघटनकौशल्याने भाजपमध्ये वेगळी ओळख निर्माण करणारे दीपक सूर्यवंशी यांचा वाढदिवस २२ ऑगस्ट रोजी अनोख्या व सेवाभावी पद्धतीने साजरा करण्यात आला. भाजप जिल्हा महानगर व्यापार आघाडीच्या वतीने पांझरा गोशाळा येथे गाईंना चारा व लापशी खाऊ घालून सूर्यवंशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

या उपक्रमाप्रसंगी जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश भोळे (राजूमामा) आणि माजी आमदार चंदूभाई पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी दीपक सूर्यवंशी यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचे कौतुक करत त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजप व्यापार आघाडीचे अशोक राठी, जिल्हाध्यक्ष विनय बाहेती, पक्षाचे जिल्हा पदाधिकारी विशाल त्रिपाठी, मिलिंद चौधरी, पितांबर भावसार, मनोज भांडारकर तसेच नगरसेवक डॉ. विरेन खडके, प्रदीप रोटे, संतोष इंगळे व विजय वानखेडे यांची उपस्थिती होती.
तसेच व्यापार आघाडीचे पदाधिकारी मुकेश कुकरेजा, आकाश मंडोरा, किसन मराठे, योगेश ढोले, मोरे, प्रकाश डोडिया, पिंटू तपडिया आणि योगेश धूर्त यांच्यासह भाजपचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दीपक सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here