ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – ‘टॉप्स सिक्युरिटी’ या समूहाविरोधातील आर्थिक गैरव्यवहाराच्या गुन्ह्याप्रकरणी मंगळवारी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयांवर छापे टाकले होते.
याप्रकरणी ईडीने बुधवारी (दि.२५) संध्याकाळी पहिली अटक केली. सरनाईक यांचे जवळचे मित्र अमित चांदोळे यांच्यावर ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. चांदोळे हे टॉप्स समूहाचे भागीदार आहेत







