क्लासला गेलेल्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, आरोपींनी व्हिडिओही शूट केला

gang-rape-on-student

जयपूर – राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील तिजारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक भयंकर घटना घडली आहे. बारावीत शिक्षण घेणाऱ्या एका १७ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी तिघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

पीडित विद्यार्थिनी क्लासला गेली होती. त्याचवेळी गावातील तीन तरुणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी तिघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तिघांचाही शोध घेतला जात आहे.

 

पीडितेच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, १७ वर्षीय पीडित मुलगी १२ वी इयत्तेत शिकत आहे. ११ नोव्हेंबर रोजी मुलगी क्लाससाठी तिजारा येथे गेली होती. त्याचवेळी गावातील तरूण नवीन तिच्याकडे आला. वडिलांनी बोलावले आहे अशी बतावणी केली. पीडित मुलगी त्याच्यासोबत निघून गेली. त्यानंतर गावातीलच आणखी दोन तरूण त्यांच्याकडे आले. त्यांनी मुलीचं तोंड दाबून तिला दुचाकीवर जबरदस्ती बसवून घेऊन गेले. त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या घटनेबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास वडिलांना ठार मारू अशी धमकीही आरोपींनी तिला दिली.

 

धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी घटनेचा व्हिडिओ काढला. त्यानंतर तो व्हायरलही केला. या घटनेने मुलीला जबरदस्त मानसिक धक्का बसला होता. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चार दिवस तिच्यावर रुग्णालयात उपचार केल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here