जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – येथील सामाजिक कार्यात कायम अग्रेसर राहणाऱ्या जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले यांचे वडील स्वर्गीय किसन नाले यांच्या स्मरणार्थ जनमत प्रतिष्ठान व/श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान कडून भागवत एकादशीनिमित्त तंटया भिल वस्तीत साबुदाणा खिचडी व केळे,चिप्स वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला.
याप्रसंगी उपस्थित बंधू आणि भगिनींना कोरोना काळातील आरोग्य मार्गदर्शक तत्वे जसे की, मास्क लावणे, हात धुणे याचे महत्व सांगून जनजागृती करण्यात आली.
साबुदाणा खिचडी वाटपप्रसंगी जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक दाभाडे, अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या जिल्हा संघटक हर्षाली पाटील, ॲड. हेमंत दाभाडे, तसेच सनशाईन अकॅडमी रावेरचे संचालक संजय चौधरी आदी उपस्थित होते.
https://www.facebook.com/BulandPoliceTimes/videos/446173903211942/?t=3






