जळगांव (प्रतिनिधी गौरव पांडे) – आज (दि.२६) जळगाव जिल्हा व महानगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे संविधान दिन निमित्ताने स्व. बाबा साहेब आंबेडकर यांची प्रतिमेला रवींद्र भैय्या साहेब पाटील जिल्हाध्यक्ष यांचे शुभ हस्ते माल्यार्पण करण्यात आले.
तसेच 26/11 मुंबई हल्ल्यातील शाहिदांनाही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी विकास पवार जिल्हा समनव्यक, सौ. कल्पना पाटील महिला आघाडी जिल्हाध्यक्षा, मनिषा ताई चौहान, अशोक पाटील, सलीम इनामदार, अशोक लाडवंजारी, सुनील माळी, साहिल पटेल, ॲड. राजेश गोयर, अशोक सोनवणे, चंद्रकांत चौधरी, पराग पाटील, महाडिक दादा, सौ. ममता तडवी, बंडू भाऊ भोळे व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे शेवटी काँग्रेस पार्टीचे खासदार स्व. अहेमद पटेल यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली.








