अवैध वाळू उपसा रोखण्यासंदर्भात पोलिसांची धडक कारवाई; १२ जणांना घेतले ताब्यात

dharangaon-valu-mafia

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – पोलीस अधिक्षक, जळगाव व जिल्हाधिकारी यांनी दोन दिवसापुर्वी गिरणा नदी पात्रातुन होत असलेल्या अवैध वाळू उपशाला प्रतिबंध करण्यासाठी उपाय योजले होते. त्याच कार्यवाहीचा भाग म्हणुन पोलीस अधिक्षक प्रविण मुंढे यांच्या आदेशाने व अप्पर पोलीस अधिक्षक चाळीसगाव सचिन गोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र रायसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली धरणगाव पोलीस स्टेशनतर्फे कारवाई करण्यात आली.

 

याबाबत पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, धरणगाव पोलीस स्टेशनचे पो.नि. जयपाल हिरे , पोको २८२६ विनोद संदानशिव, पोना १९९८ मिलींद सोनार, पोकॉ ४३२ प्रविण पाटील, चालक १०५३ वसंत कोळी होमगार्ड २४३८ सुदर्शन पाटील, होमगार्ड/ २४३४ निखिल चौधरी, होमगार्ड/ २७७१ तुषार पाटील, होमगार्ड २७६७ राहुल पाटील यांनी टॅक्टर सह ट्रॉलीमध्ये बसुन पहाटे ०२.३० ते ०५.३० वाजेपर्यंत अवैध गौण खनिजाची वाहतुक करणा-या टोळीला पकडण्यासाठी नदीपात्रात सापळा रचला.

यावेळी डंपर (क्रमांक MH-१९ 2-५४१७) वरील चालक प्रमोद सुभाष चव्हाण (वय २६ रा. सावदे प्र.चा. ता. एरंडोल) डंपर (क्र. MH-१९ BM-७५५७) वरील चालक अनिल योगराज सपकाळे (वय ४८ वर्ष रा. आव्हाणे ता.जि. जळगाव), डंपर (क्र MH १९ Z ७५५७) वरील चालक भगवान सोमा सोनवणे (वय ४० वर्ष रा. बांभोरी प्र.चा ता. धरणगाव), डंपर (क्र MH १९ BM ५६५६) वरील चालक सचिन शंकर पाटील (वय ३० वर्ष रा. शेंदुर्णी ता. जामनेर), डंपर (क्र MH २० CT ५२४७) वरील चालक सिध्दार्थ अशोक अहीरे (वय २९ वर्ष रा. पिंपळकोठा प्र.चा. ता. एरंडोल), मोटारसायकल (क्र MH १९ BA २१४७) वरील वॉचर म्हणुन काम करणारे दोन मुले मुकुंदा राज पाटील (वय २७ रा. वैजनाथ ता. एरंडोल), दिपक धनराज पाटील (वय २४ रा. वैजनाथ ता. एरंडोल) असे मिळून आले.

यातील एकाने फिर्यादीचे अंगावर डंपर घालुन त्यांना व साक्षीदारास जीवे ठार मारण्याच्या प्रयत्न केला. सदरचे डंपर तहसिल कार्यालय धरणगाव येथे सुरक्षेच्या कारणास्तव लावण्यात आले आहेत. डंपर चालक यांच्याकडे चौकशी करता त्यांनी मालकांचे नाव ढंपर (क्र MH१९ Z-५४१७ ) आनंद सपकाळे, डंपर (क्र MH-१९ BM-७५५७ ) बाळु चाटे, डंपर (क्र MH १९ Z ७५५७) बाळु चाटे, डंपर (क्र MH १९ BM ५६५६) उदय राजपुत, डंपर (क्र MH २० CT ५२४७) सचिन पाटील असे सांगितले तसेच ठेकेदार कुलभुषण पाटील (रा.जळगाव) याने मला पैसे द्या मी नदीपात्रातुन चोरलेली वाळु माझे ठेक्यावरुन आणली आहे असे सांगुन तुम्हाला तश्या पावत्या देतो असे सांगत सर्वांना एकत्र आणुन संघटीत गुन्हेगारी करण्यास प्रवृत्त केले असे निष्पन्न झाले.

सदर गुन्ह्यात एकुण १२ आरोपी विरुध्द धरणगाव पोस्टे गु.र.नं २४१/२०२० भा.दं.वि कलम ३०७, ३७९, ५११ सह गौण खनिज अधिनियम कलम २१ सह मो. वा. का. कलम २०२/१७७, १८४ अन्वये गुन्हा दाखल असुन २५१८०००/- पाच डंपर, १ ब्रास वाळु, मोटारसायकल व मोबाईल जप्त केले आहे. गुन्ह्यात पाच चालक व मोटारसायकलवरील दोन पंटर यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पो.नि. जयपाल हिरे करीत आहे.

गिरणा काठावरुन मोठ्या प्रमाणात अवैध वाळु उपास करुन शासनाचा महसुल बुडविला जातो वाळु व्यवसायातील सराईत गुन्हेगार महसुल व पोलीस प्रशासनावर वॉचर नेमुण गौण खनिज चोरी करतात. यापुढे नदीपात्राजवळ संशयीतरित्या फिरणा-या ट्रॅक्टर , डंपर, मोटारसायकल यांचेवर प्रादेशिक परीवहन विभाग, महाराष्ट्र पोलीस कायदा व मोटार वाहन कायद्याप्रमाणे कारवाई केली जाईल, असे पोलीसांकडुन सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here