- पवन ऊर्जा कंपनीच्या निष्काळजीपणामुळे गेला बालकाचा जीव
- छडवेल येथे पवन ऊर्जा टॉवरचा शॉक लागल्याने सात वर्षीय बालकाचा मृत्यू
साक्री (विशेष प्रतिनिधी) – साक्री तालुक्यातील छडवेल गावापासून सात किलोमीटर अंतरावर असलेले राजनगाव येथील सात वर्षाचा सुदीप संजय सूर्यवंशी हा टायर खेळत खेळत गावालगत असलेले पवन ऊर्जा कंपनीचे टावर जवळ पोचला सदर टावर जवळ कोणताही सुरक्षारक्षक नसल्याने तसेच जीवाला हानी न पोचावी अशी कोणतीही ही सतर्कता न बाळगल्याने या लहान मुलाला विजेचा शॉक लागला व दिनांक 17 नोव्हेंबर 2020 रोजी त्याचा मृत्यू झाला सदर परिवाराचे सांत्वन करण्यासाठी आज दिनांक 25.11. 2020 रोजी नंदुरबार जिल्हा काँग्रेस सेवादलाचे पदाधिकारी छडवेल येथे पोहचले.
याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष रउफ शहा, जिल्हा महासचिव ॲड. राहुल पाटील, तालुकाध्यक्ष नरोत्तम पाटील, नंदुरबार शहराध्यक्ष पि.के पाटील. काँग्रेस सेवादलाचे कार्यकर्ते नारायण भाऊ, हिम्मत सोलंकी, रफिक दादा यांनी मयताचे वडीलांचे सांत्वन केले मयताचे वडिलांनी माझ्या मुलगाचा जीव गेला तसा गावातील कुठल्याही बाळाचा जीव जाऊ नये याकरिता पवन ऊर्जा कंपनीने सुरक्षा रक्षक व योग्य ती सुरक्षा बाळगावी अशी मागणी केली.
निजामपुर पोलिसांनी देखील पवन ऊर्जा कंपनीच्या निष्काळजीपणाला आश्रय देत त्यांच्याविरोधात कायदेशीर कार्यवाही न करता मयताचे नातेवाईकांना मदत न केल्याने गुन्हा दाखल करता करून घेतला नाही फक्त अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 
नंदुरबार जिल्हा काँग्रेस व काँग्रेस सेवा दल आपल्या दुःखात सहभागी आहे व आपल्याला न्याय मिळेपर्यंत आपल्या सोबत न्यायासाठी लढत राहील, लवकरच पवन ऊर्जा कंपनीच्या निष्काळजीपणामुळे झालेले नुकसान हे नक्कीच पैशात मोजता येणार नाही तरी देखील आर्थिक मदत म्हणून पवन ऊर्जा कंपनी कडून मिळेपर्यंत पाठपुरावा करत राहू व सदर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री के.सी.पाडवी यांना विनंती करू असा धीर दिला.







