मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने जाहीर देशव्यापी संपाला शहादा येथे आंदोलन करुन पाठिंबा

shahada-markswadi-andolan

शहादा (प्रतिनिधी विजय निकम) – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने २६ नोव्हेंबर २०२० रोजी देशव्यापी संपाला पाठिंबा जाहीर करण्यासाठी शहादा तहसील कचेरीत निदर्शन आणि निवेदन देण्यात आले.

 

या निदर्शनात किसान सभा,शेतमजूर युनियन, सी.आय.टी.यु,आशा वर्कर्स युनियन, शालेय पोषण कामगार संघटना, वैद्यकीय प्रतिनिधी संघटना जिल्हा नंदुरबार तसेच आर.पी.आय.शहादा,वंचीत बहुजन आघाडी शहादा, डी.वाय.एफ.वाय विद्यार्थी संघटना इ.संघटनांनी सहभाग नोंदविला. पुढील मागण्यांसाठी तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात केंद्र सरकारचे शेतकरी आणि कामगार विरोधी कायदे आणि वीज विधेयक रद्द करा, प्रत्येक गरजू कुटुंबाला सहा महिने दरमहा ७५००/रु.केंद्र सरकार मार्फत द्या, प्रत्येक गरजू कुटुंबाला सहा महिने दरडोई १० किलो धान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तू मोफत द्या, कोरोना रोगराईतून सुटका व्हावी म्हणून सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सर्वत्र बळकट करा, वनाधिकार कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा.वर्स दावे मंजूर करून 4हेक्टर पर्यंत ची वनजमीन कसणाऱ्याच्या नावे करून ७/१२कसणाऱ्याच्या कब्जेदार सदरी करा, देवस्थान, इनाम,गायरान,वरकस, पडीत व महसूल जमीन कसणाऱ्याच्या नावे करा.पीक पहाणी करून प्रत्यक्ष कसणाऱ्याची नोंद करा, अवकाळी पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकरी व फॉरेस्ट प्लॉट धारकांना एकरी ५०हजार रु.नुकसान भरपाई द्या, पीकविमा योजना सर्वंकष करून तिचा फायदा विमा कंपन्यांना नव्हे तर शेतकऱ्यांना द्या, प्रत्येक आदिवासी कुटुंबाचे सर्वेक्षण करून सर्वाना सरसकट खावटी तगाई द्या, प्रत्येक कुटुंबाला मनरेगा जॉब कार्ड द्या.गावापासून ५किमी.च्या आत रोजगार हमीचे वर्षातून ३०० दिवस काम आणि ६००रु.रोजचे वेतन द्या, दारिद्रय रेषेखालील प्रत्येक कुटुंबाला केशरी न देता पिवळे कार्ड द्या.रेशन कार्ड विभक्त करून नवीन रेशन कार्ड द्या.रेशन नसलेल्यांना नवीन रेशन कार्ड द्या, पंतप्रधान घरकुल योजनेत ड यादीमध्ये ज्यांची नावे टाकण्यात आली नाहीत त्यांची पुरवणी यादीत नावे घ्या.शबरी आवास योजना गरजू लाभार्थ्यांना द्या, पेसा निधीचा प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये योग्य पद्धतीने वापर करा व विकास कामे पूर्ण करा।प्रत्येक खेड्यापाड्यात रस्त्याची ,पाण्याची आणि विजेची व्यवस्था करा, ऑनलाइन शिक्षण पद्धती बंद करा.वसतिगृहातील विध्यार्थ्यांना निर्वाह भत्ता तत्काळ सुरू करा व शाळेकडून शैक्षणिक साहित्य द्या, सर्व ग्रामीण वृद्ध, अपंग,विधवा,निराधार,परित्यक्ता या सर्वांना दर महा ३०० रु.पेंशन द्या.थकलेले पेंशन त्वरित अदा करा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

 

या निवेदनावर पदाधिकाऱ्यांसह किसान सभा,शेतमजूर युनियन, सी.आय.टी.यु,आशा वर्कर्स युनियन, शालेय पोषण कामगार संघटना, वैद्यकीय प्रतिनिधी संघटना जिल्हा नंदुरबार तसेच आर.पी.आय.शहादा,वंचीत बहुजन आघाडी शहादा, डी.वाय.एफ.वाय विद्यार्थी संघटनेच्या कॉ.सुनील गायकवाड, अरविंद कुवर, रवी मोरे. कॉ.उत्तम पवार,कॉ.राजाराम ठाकरे, कॉ.कृष्णा ठाकरे. कॉ.मोग्या पवार, कॉ.राजू वळवी, कॉ.ईश्वर ठाकरे, कॉ.ईश्वर सुरसिंग ठाकरे, कॉ.राजुद्दीन ठाकरे, कॉ.संतोष गायकवाड, कॉ.विठ्ठल सूर्यवंशी, नईम सय्यद, दिनेश गुलाले, स्वप्निल रनदिवे आदी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here