नवी मुंबई पोलीसांनी केले सराईत वाहन चोर गजाआड

navi-mumbai-bike-thief

नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – बर्‍याच दिवसांच्या अथक परिश्रमातून एपीएमसी पोलीसांना सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात यश आले आहे.एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहन चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाली असताना पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांच्या मार्गदर्शनानुसार उपायुक्त सुरेश मेंगडे सह आयुक्त विनायक वस्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास रामगुडे आणि त्यांच्या टीमने गुप्त माहितीनुसार रात्र दिवस गस्त घालून बंदोबस्त ठेवला.

 

या दरम्यान नवी मुंबई पोलिसांनी आरोपी प्रकाश कांतीलाल पांचाळ वय 54 आणि नितेश ऊर्फ गणेश राजाराम बनसोडे वय 24 या दोन सराईत गुन्हेगारांना अखेर जेरबंद करण्यास यश आले असून चौकशीतून सात वेगवेगळ्या कंपनीच्या दोन चाकी गाड्या आसा एकूण 2 लाख 65 हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात चोरीचे सात गुन्ह्यांची उकल झाली आहे.या सर्व प्रकरणाची माहिती उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

 

bike-thieves

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here