शहादा येथे संविधान गौरव दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना

shahada-savidhan-diwas

शहादा (प्रतिनिधी विजय निकम) – नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहादा येथे भारतीय संविधान गौरव दिनानिमित्त तहसील कार्यालय आवारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ विविध संघटनेच्या प्रतिनिधींनी स्वाभाविकरित्या भारतीय संविधानाचे प्रास्ताविक वाचन करून बुद्ध वंदनाचे पठण केले.

 

यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले .या गौरव दिनानिमित्त नर्मदा बचाव आंदोलन, इब्टा संघटना ,चर्मकार संघटना, जनार्दन संघटना,फुले आंबेडकर स्टडी सर्कल ,विचारधारा फाॅउन्डेशन ,बुद्धिस्ट इंटरनेशनल संघटना या विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी कृषी बिलाचे दहन करून केंद्र सरकारचा निषेध नोंदविला यावेळी डॉ. सरला पेंढारकर यांनी संविधान प्रास्ताविकाचे वाचन करून उपस्थितांनकडून शपथ करून घेतली .धंम्म मित्र संजय निकुंभे यांनी सामाईक बुध्दवंदनेचे पठन केले.

 

प्रदिप केदारेश्वर, चूनिलाल ब्राह्मणे, अनिल कुवर, दादा पिंपळे, आदींनी संविधान गीते सादर केली.तर दादा पिंपळे, चेतन साळवे, प्रा. विष्णू जोंधळे, श्री पटले, आदींनी संविधान गौरव दिनाचे महत्व पटवून मार्गदर्शन करीत केंद्र सरकारच्या कृषी धोरण शेतकऱ्यांसाठी किती घातक आहे .याबाबत महत्त्व पटवून दिले व कृषी बिलाचे दहन केले तसेच याबाबत प्रांतधिकारी चेतनसिंग गिरासे यांना निवेदन देण्यात आले.shahada-nivedan

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here