जी.एस. ए. स्कुलमध्ये संविधान दिनानिमित्त महामानवाला वंदन

savidhan-diwas-dharangaon

धरणगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये सोशल डिस्टनसिंग चे नियम पाळत , महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

 

याबाबत सविस्तर माहिती अशी की , आज २६ नोव्हेंबर म्हणजेच ‘संविधान दिन…’ धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य असलेल्या भारतातील सर्व जनतेला स्वातंत्र्य , समता , न्याय आणि बंधुता इ. विविध मूल्य संविधानामुळे प्राप्त झाली आहेत. संविधान आहे म्हणून सर्व भारतीयांचे हक्क आणि अधिकार अबाधित आहेत. असे अनमोल संविधान ज्यांच्या अथक परिश्रमाने पूर्णत्वास आले ते घटनेचे शिल्पकार , विश्वरत्न महामानव , भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला शाळेच्या प्राचार्य चैताली रावतोळे व शाखा व्यवस्थापक जगन गावित यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी लक्ष्मण पाटील यांनी संविधानाचे महत्व सांगितले व संविधानाची उद्देशिका ( प्रास्ताविकाचे ) वाचन केले. या प्रसंगाचे औचित्य साधून २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबई येथे झालेल्या अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेला वीरांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.

 

याप्रसंगी शाळेच्या प्राचार्य चैताली रावतोळे , शाखा व्यवस्थापक जगन गावित यांच्यासह अनुराधा भावे , स्वाती भावे , गायत्री सोनवणे , ग्रीष्मा पाटील , पूनम कासार , रमिला गावित , सपना पाटील , शिरीन खाटीक , दामिनी पगारीया , पुष्पलता भदाणे , अमोल सोनार लक्ष्मण पाटील हे शिक्षकवृंद आणि सरला पाटील , इंद्रसिंग पावरा , अमोल देशमुख हे शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here