3 डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिवस काळा दिवस साजरा करणार – जिल्हाध्यक्ष पी एम पाटील

p-m-patil-sir-dharangaon

धरणगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – 3 डिसेंबर हा जागतिक दिव्यांग (अपंग) दिवस म्हणून साजरा करण्यात येतो परंतु राष्ट्रीय विकलांग पार्टी त्या दिवशी काळा दिवस म्हणून साजरा करणार आहे.ज्या दिव्यांग बांधवांना केंद्र व राज्य शासनाने विविध योजना काढल्या आहेत परंतु आज जळगाव जिल्ह्यात 80 हजार दिव्यांग बांधव असून अनेक बांधव या योजनांपासून आजही वंचित आहे.

 

त्यांना न्याय मिळावा या उद्देशाने 3 डिसेंबर रोजी प्रत्येक तालुक्यात तहसील दारांना आपल्या मागण्याचे निवेदन दयावयांचे असून काळया फिती लावून निवेदन दयावे तसेच सर्वच दिव्यांगाना 35 किलो धान्य अंत्योदय योजने द्वारे मिळावे तरी सर्व दिव्यांगानी 3 डिसेंबर रोजी 11 वाजता आपआपल्या तालुक्यात निवेदन दयावे व जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा कार्यालयावर उपस्थित रहावे.

 

या प्रसंगी प्रदेश अध्यक्ष धनराज गायकवाड, उपाध्यक्ष धनंजय कुमार उपस्थित राहणार आहेत असे आवाहन पी एम पाटील, संजय पाटील, सौ प्रतिभा पाटील यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here