सांगली (जिल्हा प्रतिनिधी राजु पाटील) – जैलाब शेख मित्र मंडळ व आर.पी.आय. मिरज शहर यांचे कडून २६/११ हल्यात शहीद जवानांना पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी जैलाब शेख म्हणाले २६/११ हा दिन भारतीय इतिहासातील फार दुर्दैवी दिवस आज रोजी मुंबई येथे भारत देशाचे तसेच जनतेचे रक्षण करण्यासाठी शहीद हेमंत करकरे, शहीद अशोक कामटे व साथीदार पोलीस भारत देशाचे रक्षक शहीद झाले. ते जरी ह्या सृष्टी वर जिवंत नसले तरी त्यांच्या स्मृती आम्ही भारतीय नागरिक कदापि विसरणार नाही.
यावेळी आर.पी.आय.(I.T. Cell) चे सांगली जिल्हाध्यक्ष योगेंद्रभाऊ कांबळे, मिरज शहर अध्यक्ष अविनाश कांबळे, रावजी कांबळे, सतीशकुमार कांबळे, गिरीष कांबळे इ. उपस्थित होते.







