शिवाजीनगर येथे धर्मरथ फाउंडेशनच्या माध्यमातून नवीन मतदार नोंदणी शिबिर

dharmrath-foundation

जळगांव (प्रतिनिधी गौरव पांडे) – जिल्हा निवडणूक आयोगातर्फे आणि धर्मरथ फाउंडेशनच्या माध्यमातून 28/11/2020 पासून ते 1 जानेवारी 2021 या दरम्यान निवडून आयोगाच्या नियमानुसार व त्यांच्या मार्गदर्शनानुसार प्रभाग क्रमांक 2 मधील शिवाजी नगर भागापासून नवीन मतदार नोंदणी तसेच मयत मतदारांचे यादीतील नावे कमी करणे आणि मतदार यादीतील पत्ता बदल करण्याची मोहीम राबवण्यात येणार आहे.

 

प्रभागातील नागरिकांनी धर्मरथ फाऊंडेशनशी संपर्क साधून या शिबिराचा फायदा घ्यावा जेणेकरून कोणीही मतदार आपल्या अमूल्य मतदानाच्या अधिकारापासून वंचित रहणार नाही तसेच या संदर्भात कुठली तकारार असेल तर तुम्ही आमच्याशी विनायक पाटील – 8888227775, निशांत पाटील – 8087152595 या क्रमांकावर संपर्क साधू शकता असे धर्मरथ फाउंडेशनचे अध्यक्ष विनायक पाटील यांनी कळविले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here