चार महिन्यापूर्वी सुपारी देवून केलेल्या खुनाचा उलगडा; कासारवडवली पोलीस स्टेशनची कारवाई

kasar-vadvli-police

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – कासारवडवली पोलीस स्टेशन हद्दीत नागलाबंदर, भाईंदरपाडा, घोडबंदर रोड, ठाणे येथे इसम नामे तानाजी लक्ष्मण जावीर, वय ४८ वर्षे हे बळीराम नागलकर यांचे घरी वाहन चालक आणि प्रॉपर्टीचे देखभाल करण्याचे काम मागील १२ वर्षापासुन करीत होते. तानाजी जावीर हे दिनांक १७/०७/२०२० रोजी नागलाबंदर परिसरातुन बेपत्ता झाले होते. त्यांचे लहान भाऊ श्री. अनिल जावीर, वय ३८ वर्षे यांचा मोठे भाऊ तानाजी यांचेशी फोनवर संपर्क होत नसल्याने दिनांक २३/०७/२०२० रोजी त्यांनी कासारवडवली पो.स्टे. येथे मानव मिसींग नोंद क्रमांक ३८/२०२० अन्वये खबर दिली होती.

 

 

सदर प्रकरणी बेपत्ता इसम तानाजी जावीर यांचा शोध ०३ पोलीस पथकांमार्फत सुरू होता. त्या दरम्यान पोलीसांना गोपनीय माहिती मिळाली होती की, नमुद बेपत्ता इसमाची हत्या करण्यात आली असून नागलाबंदर परिसरातील एक संशयीत इसम हत्येत सहभागी आहे. मिळालेल्या माहितीनुसार नमुद संशयीत इसम नामे संतोष चंद्रकांत घुगरे, वय ३० वर्षे यास कल्याण येथे तो लपलेल्या ठिकाणावरून ताब्यात घेतले. त्याचेकडे केलेल्या तपासात त्याने त्याचा साथीदार नामे मंगेश गणेश मुरूडकर, वय ३५ वर्षे याचे मदतीने तानाजी जावीर याचा दिनांक १७/०७/२०२० रोजी खुन केल्याचे कबुल केले.

नमुद मिसींग प्रकरणातुन कासारवडवली पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद कं. २९४/२०२०, भा.दं.वि. कलम ३०२,१२०(ब),२०१, ३४ प्रमाणे दिनांक २४/११/२०२० रोजी २३.३० वाजता दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयामध्ये आरोपी ०१) संतोष चंद्रकांत घुगरे वय – ३० वर्षे, ०२) मंगेश गणेश मुरूडकर वय-३५ वर्षे, ०३) गिता अविनाश आरोळकर वय – ४५ वर्षे आणि ०४) श्रीमती कल्पना बळीराम नागलकर य – ४५ वर्षे यांना अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपींची दिनांक २८/११/२०२० रोजी पर्यंत पोलीस कोठडी मंजुर आहे.

 

यातील बेपत्ता/मयत इसम तानाजी लक्ष्मण जावीर, वय ४८ वर्षे हा आरोपी कं. ०४ श्रीमती कल्पना बळीराम नागलकर, वय ४५ वर्षे हिचे प्रॉपर्टीचे काम पाहत होता. त्या वादातून त्यांचेत सतत भांडण होत असल्याने त्याचा काटा काढण्याच्या दृष्टीने तिने आरोपी कं. ०३ गिता अविनाश आरोलकर हिस त्यास मारण्यासाठी एकूण १,४०,000/- इतकी सुपारीची रक्कम दिलेली असून आरोपी कं. ०१) संतोष चंद्रकांत घुगरे वय – ३० वर्षे व ०२) मंगेश गणेश मुरूडकर वय-३५ वर्षे यांनी मयत यास दारू पिण्याचे बहाण्याने गायमुख खाडी किनारी बोलावून त्याचे दारूत कुठलेतरी विषारी औषध मिसळून त्याला जिवे ठार मारले आणि त्याचा मृतदेह गायमुख खाडी किनाऱ्यालगत एका निर्जन ठिकाणी कोणालाही दिसणानार नाही अशा पध्दतीने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने फेकून दिला होता. सदर मृतदेहाचे अवशेष आणि मयत इसमाचे कपडे जप्त करण्यात आले आहेत. अशा रितीने अत्यंत कसोशीने तपास करून सदर गुन्हा उघडकीस आणण्यास कासारवडवली पोलीसांना यश आले आहे.

 

सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस आयुक्त, ठाणे शहर विवेक फणसळकर, सह पोलीस आयुक्त सुरेश मेकला, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम.प्रा.विभाग, अनिल कुंभारे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५ डॉ. विनयकुमार राठोड, सहा. पोलीस आयुक्त, वर्तकनगर विभाग, पंकज शिरसाठ यांचे मार्गदर्शन लाभले. सदर तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कासारवडवली पोलीस ठाणे किशोर खैरनार यांचे नेतृत्वाखाली पोनि/गुन्हे अविनाश काळदाते, पोनि/प्रशासन जयराज रणवरे, सपोनि/सागर जाधव, पोउनि/कुलदीप मोरे व स्टाफ यांनी केला असून गुन्हयाचा पुढील तपास पोनि/गुन्हे अविनाश काळदाते हे करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here