नवी मुंबई महानगर पालिकेने नाट्यगृहाचे पुर्ण भाडे माफ करावे. नाट्यकलावंत प्रशांत दामले यांची मनपा आयुक्तांची भेट घेत मागणी

Prashant-Damle3

नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – राज्य शासनाने मराठी नाटकांना परवानगी देत नाट्यगृह सुरू केली आहेत. मात्र त्यात काही अटी ठेवल्या आहेत.आम्ही आर्थिक मेळ जुळवण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्हाला नाट्यगृहाच्या भाड्यात सवलत मिळण्या ऐवजी पुर्ण भाडे माफ करावे अशी मागणी रंगमभूमी कलावंत व सिने अभिनेते प्रशांत दामले यांनी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांकडे केली आहे.Prashant-Damle2

 

 

प्रशांत दामले यांनी आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेत वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहाचे भाडे रद्द करावे अशी मागणी केली आहे. कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेता ५० टक्केच प्रेक्षकवर्ग नाट्यगृहात येऊ शकतो अशी अट घालण्यात आली आहे. या नियमाने नाट्यसंस्थांना आर्थिक फटका बसणार आहे.Prashant-Damle

 

 

नवी मुंबईत विष्णुदास भावे नाट्यगृहात नाटकांना भाडे आकारले जाऊ नये अशी मागणी प्रशांत दामले यांनी आयुक्तांकडे करत भेडसावणाऱ्या अडचणी त्यांच्या लक्षात आणून दिल्या. आधीच मराठी नाटकांना पुरेसा प्रेक्षकवर्ग लाभत नसल्याने अनेक संस्थांना तोटा सहन करावा लागत आहे. भाडे न आकारण्याची सवलत मिळाल्यास त्यावर विसंबून असलेल्या कलाकारांसह व शेकडो कर्मचाऱ्यांना देखील दिलासा मिळणार आहे. तसेच नाटके देखील जिवंत राहतील अशी मागणी दामले यांनी आयुक्तांकडे केली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here