कल्याण (प्रतिनिधी) – दि. ०५ जुलै २०२० (गुरुपौर्णिमा) रोजी वय ४८ “कल्याण-डोंबिवली महानगर पालिका” आरोग्य विभागाच्या गलथान व अपु-या सुविधांचा पुन्हा एक बळी ठरला.
बिपीएलचे प्रमाणपत्र.. असतांनाही हॉलीक्रॉस हॉस्पिटल, कल्याण येथे कोव्हिड चाचणीचे (RT-PCR) दोनहजार आठशे रुपये घेऊन त्याची चाचणी करण्यात आली. कडोमपाने परवानगी दिलेल्या मेट्रोपोलिस लॅब मार्फत हॉलीक्रॉस हॉस्पिटल येथे कोव्हिड चाचणी केली जाते. शासनाने दारिद्र्य रेषेखालील नागरीकांसाठी ही चाचणी मोफत ठेवली असतांनाही मेट्रोपोलिस लॅब अशा नागरीकांची पिवळे रेशनकार्ड असेलतरच मोफत चाचणीचा लाभ मिळेल दिशाभुल करते.
आणि अशा नागरीकांकडे महानगरपालिकेने दिलेले बिपीएल प्रमाणपत्र असतांना ही त्यांची फसवणुक करुन त्यांचेकडून पैसे उकळले जातात. ही बाब प्रहार जनशक्ती पक्षाचे कल्याण तालुका संघटक आदर्श भालेराव यांनी महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी कदम व अभियंता विनय कुलकर्णी यांच्या निदर्शनास आणून दिलेली असतांनाही पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने त्यांच्या संगनमतानेच आर्थिक दृष्ट्या गरीब लोकांची लुबाडणूक चालू आहे अशी शंका घेण्यास वाव आहे.
यासंदर्भात पोलीस प्रशासनाला अन्याय अत्याचार निर्मुलन समिती महाराष्ट्र राज्य सचिव मा महेंद्र उर्फ अण्णा पंडित यांनी लेखी तक्रार केली असता संबंधितावर अद्यापही त्यांनी गुन्हा न नोंदवता सहायक पोलिस निरीक्षक देविदास ढोले यांनी आम्ही चौकशी करु मग गुन्हा नोंदवू अशी बेजबाबदार उत्तरे देवुन व लॉकडाऊनचे निमित्त साधुन
सबंधितांना वाचविण्यासाठी गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ करीत आहेत…
राहूलचा कोविडचाचणी अहवाल पॉजिटिव्ह आल्याने व त्याला श्वसनाचा त्रास जास्त जाणवू लागल्याने राहुलवर तातडीने उपचार करणेकरीता डॉक्टरांना वारंवार पालिकेचे शास्त्री नगर रुग्णालयतील अर्चना कासले यांनी सतत फोनकरुन सांगीतले असता प्रथम बेड उपलब्ध नसल्याचे कारण सांगण्यात आले. व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याने डॉ दौंड यांनी खडकपाडा येथील श्वास हॉस्पिटलमध्ये व्यवस्था करतो सांगुन राहुलला तेथे पाठवले.(अॅम्ब्युलन्स उपलब्ध करुन दिली होती)
पन्नासहजार डिपॉजीट भरा पेशंटला ऍडमिट करतो असे उतर मिळाल्याने पेशंटचा भाऊ गर्भगळीत झाला.. ही बाब डॉ. दौंड यांना सांगितल्यानंतर मी तुमच्या साठी एवढेच करु शकतो. कुठे ही बेड उपलब्ध नाही. या उपर मी तुमची काही ही मदत करु शकत नाही असे बोलुन फोन घेण्याचे पण बंद केले. दरम्यान दोन तास पेशंट श्वास हॉस्पीटलच्या गेटवर श्वास मोजत होता.
महेंद्र अण्णा पंडित यांनी अभियंता कुलकर्णी डॉ कदम यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी अम्ब्युलंस पाठवुन शास्रीनगर डोंबिवली येथील हॉस्पिटल मध्ये अडमीट करुन घेतले.
परंतू तेथेही महापालिकेचे आरोग्यखाते आमच्या कडे राहुलला व्हेंटीलेटर बेड नाही त्यासाठी आपण कोठे तरी त्याची सोय करा आम्ही काही करू शकत नाही खाजगी कॉव्हिड रुग्णालय आम्हला सहकार्य करत नाही असे उत्तर देऊन शास्त्री रुग्णालयातील व्यवस्थापण विभागाने व्हेंटीलेटर उपलब्ध करुन देवू न शकल्याने बळी घेतला.
…… ही परवड येथेच थांबत नाही. राहूलचा मृत्यूदेह देण्यासाठी पालिकेच्या CMO यांच्या कडून शववाहिन उपलब्ध होत नाही हीच मोठी शिकांतिका आहे मृतदेह एक दोन तासाने ताब्यात दिल्यानंतर त्याच्या अंत्यसंस्कार कल्याण डोंबिवली मधील जवळपास पाच सहा स्मशानभुमीत विद्यूतदाहीनी बंद असल्याच्य कारणावरुन त्याच्यावर अंत्यसंस्कार करणेस नकार देण्यात आला. दत्तनगर डोंबिवली स्मशानभुमीत प्रेत ४ तास ठेवावी लागली दत्तनगर डोंबिवली स्मशानभुमीत विद्युतीदाहीन बंद असल्याचे कारण सांगितले व कोरोना रुग्णाला लाकडावर अंत्यसंस्कार करण्यास पालिकेने मनाई केल्याचे सांगण्यात आले. तेव्हा सन्माननिय आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांच्या निदर्शना महेंद्र अण्णा पंडित यांनी सदरची बाब आणुन दिल्यानंतर आठतासानंतर रात्री दहाच्या दरम्यान अत्यसंस्कार करण्यात आले.या सर्वाचा खुलासा प्रहार जनशक्ती पक्षाचे कल्याण तालुका संघटक आदर्श भालेराव यांनी उघड केले आहे लवकरच प्रहार पालिकेच्या निष्काळजी पणा मुळे व आज पर्यत पालिकेच्या असुविधा मूळे बेजबाबदार अधिकारी मूळे प्रहार जनशक्ती पक्ष तर्फे सदोष मनुष्यवदाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येणार आहे लॉक डाऊन खुलताच प्रहार पालिकेच्या अधिकारी यांच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हा अध्यक्ष ऍड स्वप्नील पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रहार जनशक्ती कमिटी लॉक डाऊन नंतर ठाणे जिल्हा संपर्क प्रमुक हितेश जाधव, जिल्हा अध्यक्ष ऍड स्वप्नील पाटील , ठाणे सचिव सुनील शिरिषकर ठाणे ग्रामीण अध्यक्ष प्रेम प्रधान,कल्याण शहर अध्यक्ष सूर्यकांत तांबोळी,कल्याण ग्रा तालुका अध्यक्ष सिद्धार्थ बोराडे, कल्याण तालुका सचिव प्रदीप सोनवणे, कल्याण उपशहर अध्यक्ष प्रशांत मोरे, कल्याण शहर उपाध्यक्ष संजय भोरडे, ठाणे जिल्हा कमिटी तर्फे व मानवी अन्याय निर्मूलन संघटना जिल्हा अध्यक्षतेखाली महिला संरक्षण समिती सुवर्णा ताई कानवडे, गौरी पाटील, मधू आठवले, साक्षी साळवे, कोमल धनले,राजश्री खराटे, रेखा मोरे, एकता अन्सारी राज्याचे गृहमंत्री मा अनिल देशमुख व महिला बाळ कल्याण चे राज्य मंत्री ना मा बचू कडू यांची भेट घेऊन प्रशासना मध्ये चालत असलेल्या गैरकारभार व मनमानी कारभार करणाऱ्या वर कठोर कारवाई करावी म्हणून सर्व पुरावे सहित मागणी करण्यात येणार आहे पालिका नागरिकांच्या जीवाशी खेळत असेल तर प्रहार सहन करून घेणार नाही या संदर्भात लवकरच आंदोलन करू असे आदर्श भालेराव यांनी माहिती दिली
Home Uncategorized कल्याण-डोंबिवली महानगर पालिका आरोग्य विभागाच्या गलथान व अपु-या सुविधांचा पुन्हा एक बळी...







