धरणगाव (योगेश पी पाटील) – येथील प्रभाग क्रमांक सात मधील नागरिकांना आर्सेनिक अल्बम-30 गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात
आले.
जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.गुलाबरावजी पाटील व शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबरावजी वाघ यांच्या सहकार्याने व धरणगांव न.पा. प्रशासन नगराध्यक्ष निलेश चौधरी, व मुख्याधिकारी जनार्दन पवार आरोग्य विभागा तर्फे आर्सेनिक अल्बम ’30’ होमिओपॅथी गोळ्यांचे मोफत वाटप प्रभाग क्रमांक सातच्या नगरसेविका सौ आराधना नंदकिशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
संपूर्ण धरणगांव शहराला पुरतील एवढ्या गोळ्या न.पा. प्रशासनाकडे उपलब्ध असून त्याचे मोफत वाटप सुद्धा सुरू झाले आहे.
रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी या गोळ्यांचे वाटप केले जात असून त्याचा नियम व काही अटींचे परीपत्रक सुद्धा नागरिकांना देण्यात येत आहे.कोरोना संबंधित उपाययोजना बाबतीत सुद्धा न.पा.परिपत्रक दिले जात आहे.
ज्या नागरिकान पर्यंत गोळ्या काही कारणास्तव पोहचूशकणार नाही त्यांनी धरणगांव न.पा. आरोग्य विभागाचे प्रमुख रवींद्र गांगुर्डे,निलेश वाणी यांच्याशी संपर्क साधावा.
प्रभाग क्रमांक सात येथे गोळ्या वाटप प्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख मा.नगराध्यक्ष पी.एम.पाटील सर,विवेकानंद पत संस्थेचे संचालक छोटू जाधव,उप शहर प्रमुख रवींद्र जाधव,मेडिकल असोसिएशनचे डॉ.विकास महाजन,किरण अग्निहोत्री उप शहर प्रमुख,युवासेनेचे कमलेश बोरसे,नाभीक समाजाचे अध्यक्ष सतीश बोरसे, लांडगे गल्ली शाखा प्रमुख नागराज पाटील,रावसाहेब पाटील,नंदू पाटील, प्रवीण जाधव,मोहम्मद बोहरी आदी उपस्थित होते.







