बोधी ग्राहक संघात संविधान अर्पण दिन साजरा

bodhi-grahak-sangh-mumbai

मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरुण चव्हाण) – बोधी ग्राहक संघाची वार्षिक सभा विक्रोळी पूर्व, कन्नमवार नगर १ येथील कार्यालयात गुरुवार, दिनांक २६ नोव्हेंबर २०२० रोजी पार पडली. सदर प्रसंगी प्रतिज्ञा आणि राज्यघटनेच्या कलम ४७ चे. सामूहिक वाचन करण्यात आले. अँड. राजेश कलोते यांनी बोधी ग्राहक संघाच्या वाटचालीचा आढावा आणि पुढील वाटचाल कशी असणार याची माहिती कार्यक्रमात दिली.

 

 

सदर कार्यक्रमात विक्रोळी विभागात दहावी इयत्तेत प्रथम आलेली समीक्षा खंडागळे या विद्यार्थींनीचा आणि याच वर्षी डॉक्टरेट मिळविलेल्या तिच्या मातोश्री डॉ. जयश्री खंडागळे यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. जयश्री खंडागळे “भाषेनुसार प्रांत” याविषयात पी. एच. डी प्राप्त केलेली आहे. या संघाने आदिवासी विभागातील शेतकऱ्यांनी ऑर्गेनिक फार्मिंगने उगवलेला तांदूळ खरेदी केला. त्याचबरोबर बचत गटाच्या काही महिलांद्वारे तैयार केलेला दिवाळी फराळ उपस्थित संस्था सदस्यानी आर्थिक मदत म्हणून विकत घेतला.

 

 

सभेची सांगता संविधान लोकार्पण दिनानिमित्त नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्यच्या मुंबई पूर्व विभाग संघटिका प्रियांका सवाखंडे यांनी संविधान उद्देशिके सोबत कलम ४७ चे विशेष वाचन करुन झाली. यावेळी संचालक मंडळाचे सुधाकर गायकवाड यांनी त्यांच्या कार्यालयच्या सहकार्यांच्या जागृतीसाठी कलम ४७ च्या पन्नास प्रत मागवल्या आहेत. ज्ञानेश्वर तायडे यांनी समाजातील वाढलेली व्यसनाधिनता यावर आपले अनुभव, विचार व्यक्त करून नशामुक्त मुंबई अभियानात सहभागी होऊन युवकांना आणि व्यसनाधीन व्यक्तीना नशामुक्त करण्यास सहकार्य करण्याचा दृढ़ संकल्प घेतला. संस्था अध्यक्ष्य प्रविण यादव याना संविधान उद्देशिका प्रत तर संचालकाना संविधान कलम ४७ ची प्रत संस्थेस भेट म्हणून देण्यात आली.
संचालक दिनकर गायकवाड, विठ्ठल सोनवणे, नामदेव साळवे, शंकर वाघमारे, अमित भांगरे, पंढरीनाथ साळवे, साधना सावंत आणि सभासद सत्यवान तोड़के, शुभांगी माने, गौतम रणशेवरे, किशोर माने तसेच नशाबंदी मंडळाच्या संघटक प्रियांका सवाखंडे यासर्वांची हजेरी यावेळी लागली. कार्यक्रमाचे आयोजन करोना संसर्ग लक्षात घेऊन मोजक्या लोकांच्या उपस्थितीत सोशल डिस्टंसिंग पाळून पार पडले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here