महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या पाठपुराव्यास यश…
खुलताबाद (प्रतिनिधी सतीश कोळी) – ३१ डिसेंबर २००७ पर्यंत संगणक अहर्ता धारण न करणाऱ्या शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या वार्षिक वेतन वाढी बंद करून वसुली करण्याचे राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने २६ नोव्हेंबरला आदेश काढले होते. या आदेशावर राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने यासंबंधाने मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री ना.अजितजी पवार यांना २६ नोव्हेंबर चे शासन आदेश स्थगित करण्याची मागणी केली होती. यासंबंधाने राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना.जयंतराव पाटील यांची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे यांनी शुक्रवारी (ता.२७ नोव्हेंबर) इस्लामपूर (सांगली) येथे भेट घेऊन संगणक अहर्तेच्या संबंधाने निर्माण झालेल्या अडचणी लक्षात आणून दिल्या. राज्यातील जिल्हा परिषदेच्या सर्वच शिक्षकांनी संगणक अहर्ता धारण केली आहे.राज्यातील ग्रामीण भागात काम करणाऱ्या शिक्षकांच्या त्याकाळच्या अडचणी आणि शिक्षकांना संगणक अर्हता धारण करण्यासंबंधाने सुस्पष्ट आदेश नसल्यामुळे २००७ पूर्वी शिक्षक अर्धा धारण करू शकले नाही.
मात्र आता शिक्षकांनी अहर्ता धारण केली असल्यामुळे वेतनवाढीची वसुली करण्यात येऊ नये. यासंबंधाने लक्ष घालण्याची विनंती केली. नामदार जयंत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे यांना लगेच फोन करून या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात आणून दिले.
मा.मुख्यमंत्री ना.उद्धवराव ठाकरे यांनी तात्काळ लक्ष घालत २६ नोव्हेंबरच्या आदेशाला स्थगिती देण्याचे आदेश निर्गमित केले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस विजय कोंबे यांनी दिली आहे.
अवघ्या चोवीस तासात शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या वसुली त्यासंबंधाने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या निवेदनावर निर्णय घेऊन काढलेल्या आदेशात बद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार,जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंतराव पाटील,महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे आभार मानले आहे.
ना.जयंतराव पाटील यांना इस्लामपूर येथे शुक्रवारी २७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे यांचे नेतृत्वात भेटलेल्या शिष्टमंडळात शिक्षक समितीचे विश्वनाथ मिरजकर,राज्य संपर्कप्रमुख सयाजी पाटील,सांगली जिल्हा शाखेचे अध्यक्ष बाबा लाड, मनोज पाटील,रमेश पाटील, वजीर मुल्ला आदी सहभागी झाले होते.असे औरंगाबाद शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विजय साळकर,जिल्हा सरचिटणीस रंजित राठोड,के.के जंगले,अंकूश वाहूळ,कडुबा साळवे,दत्ता खाडे,विलास साळूंके,निंबा साळुंके,मच्छिंद्र निमोणे,बबन चव्हाण,विलास चव्हाण,अतूल गायके,वासुदेव कोळी,यांनी कळविले आहे.







