मराठा आरक्षणाची दैनंदिन सुनावणी घेणे आवश्यक आहे

नाशिक (तन्मय गांगुर्डे) – मराठा आरक्षणला आज कोणतीही स्थगिती मिळाली नाही. 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर आरक्षणाची सुनावणी घ्या अशी मागणी आपल्या वकिलांनी केली. त्यावर न्यायालयाने सांगितले की, अंतिम सुनावणीच्या अगोदर याबाबत आम्ही स्पष्टता करू.
मराठा आरक्षणाच्या संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सुनावणी झाली. या संदर्भात दैनंदिन सुनावणी घेणे आवश्यक आहे असे न्यायालयाने मत व्यक्त केले. पुढील सुनावणी 15 जुलै रोजी घेण्यात येईल.
पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशामधील आरक्षणाविरोधातील निर्णय बुधवारी होईल. राज्य सरकारने यासाठी तयारी करण्याची गरज आहे. आज आपल्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारची स्थगिती मिळाली नाही ही आनंदाची बाब आहे. मला विश्वास आहे की ही लढाई आपणच जिंकू!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here