मनपा उपायुक्त मिनिनाथ दंडवते यांची बदली

जळगाव (प्रतिनिधी) – येथील महानगरपालिकेचे उपायुक्त मिनिनाथ दंडवते यांची अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणून बदली झाली आहे. उपसचिव कैलास बधान यांनी आज (दि.७) पाठविलेल्या आदेशानुसार श्री.दंडवते यांनी उद्या (दि.८) रुजू होवून तसा अहवाल शासनास सादर करावयाचा आहे. दंडवते यांच्या जागेवर कोणाची नियुक्ती झाली या प्रश्न अद्यापही गुलदस्त्यात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here