जळगाव जिल्ह्यात आज आढळले २१७ कोरोना बाधित

जळगाव – आज (दि.७) प्राप्त झालेल्या तपासणी अहवालात २१७ रुग्णांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
जळगांव जिल्ह्यात आज आढळलेल्या २१७ पॉझीटीव्ह रुग्णांमध्ये जळगाव शहर 92, जळगाव ग्रामीण ११, भुसावळ ६, अमळनेर १, चोपडा ११, भडगाव ५, धरणगाव २, यावल ६, एरंडोल ३, जामनेर ५, रावेर १५, पारोळा २६, चाळीसगाव १८, बोदवड १५, दुसऱ्या जिल्ह्यातील १ रुग्ण असा समावेश आहे. त्यामुळे आज अखेर जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४८०३ झाली आहे.
आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या १११ असून, आज अखेर बरे झालेले एकूण रुग्ण २८२८ आहेत. आजपर्यंत जळगाव जिल्ह्यात २९३ कोरोना बाधितांचे मृत्यू झाले असून, आज ११ रुग्ण उपचारादरम्यान दगावले आहेत. २१५ रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याचे, जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here